- 1.20 - नवव्या फेरी अखेर भाजपचे उन्मेष पाटील हे १ लाख ६२ हजार ६७५ मतांनी आघाडीवर
- 1.12 - नवव्या फेरी अखेर भाजपचे उन्मेष पाटील २ लाख ६९ हजार ५२५ इतकी मते तर राष्ट्रवादीच्या गुलाबराव पाटील यांना १ लाख ६ हजार ८५० इतकी मते
- 12.51 - भाजपचे उन्मेष पाटील यांना २ लाख ११ हजार ५१६
- 12.51 - राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांना ८१ हजार ५६१
- 12.50 - भाजपचे उन्मेष पाटील १ लाख २९ हजार ९५५ मतांनी आघाडीवर
- 11.30 - आठव्या फेरी अखेर भाजपचे उन्मेष पाटील १ लाख ५२ हजार मतांनी आघाडीवर
- 11.00 सहाव्या फेरी अखेर भाजपचे उन्मेष पाटील १ लाख २२ हजार मतांनी आघाडीवर
- 9.50 - चौथ्या फेरी अखेर भाजपचे उन्मेष पाटील ७८ हजार ७३४ मतांनी आघाडीवर
- 9.20 तिसऱ्या फेरी अखेर 52 हजार मतांनी उन्मेष पाटील आघाडीवर
- 9.00 - भाजपचे उन्मेष पाटील आघाडीवर
- 8.00 - मतमोजणीला सुरूवात
- 7.30 - मतमोजणी केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी दाखल
जळगाव - लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होईल. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीत प्रमुख लढत झाली आहे. राष्ट्रवादीकडून माजीमंत्री गुलाबराव देवकर तर भाजपकडून आमदार उन्मेष पाटील हे रिंगणात उतरले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या देखील रिंगणात आहेत. परंतु त्यांचे फारसे आव्हान असणार नाही. भाजपने विद्यमान खासदार ए.टी पाटलांचा पत्ता कट करून स्मिता वाघ यांना दिलेली उमेदवारीची माळ अखेरच्या दिवशी उन्मेष पाटलांच्या गळ्यात घातली होती. त्यामुळे ही निवडणूक देवकर आप्पांच्या पथ्थ्यावर पडणार की उन्मेष पाटील येथील कारभार पाहणार याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
शहरातील महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन येथे आज मतमोजणी पार पडत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघात यावेळी एकूण ५६.११ टक्के इतके मतदान झाले आहे. मागील वेळी पेक्षा मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट झाली आहे.
२०१४ ची परिस्थिती-
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ए. टी. पाटील यांनी राज्यात विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होते. यावेळी एकूण ५८ टक्के इतके मतदान झाले होते. त्यावेळी भाजपचे ए.टी. पाटील यांनी ६ लाख ४७ हजार ७७३ मते मिळवून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.सतीश पाटील यांचा ३ लाख ८२ हजार ९२५मतांनी पराभव केला होता. सतीश पाटील यांना एकूण २ लाख ६४ हजार ८३८ इतकी मतं मिळाली होती.
एटी पाटील यांच्या विजयानंतर मागील पाच वर्षांत जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विधानसभेसह जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची सत्ता स्थापन केली होती. यामुळे मागच्या पाच वर्षांत मतदारसंघात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पूर्णत: सफाया झाला होता. या घडामोडींचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असल्याने दोन्ही आघाड्यांनी निवडणुकी दरम्यान मतदारांचे मत आपल्याकडे वळविण्याठी जोर लावला होता. आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.