ETV Bharat / state

उन्मेष पाटीलही कोट्यधीश उमेदवार; सव्वा कोटी रुपयांचे धनी - unmesh patil property

लोकसभा मतदारसंघात विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांचा पत्ता कापून ऐनवेळी उमेदवारी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झालेले भाजपचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हेदेखील कोट्यधीश आहेत. त्यांनी आपल्या निवडणूक उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती समोर आली आहे.

उन्मेष पाटील
author img

By

Published : Apr 5, 2019, 6:00 PM IST

जळगाव - लोकसभा मतदारसंघात विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांचा पत्ता कापून ऐनवेळी उमेदवारी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झालेले भाजपचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हेदेखील कोट्यधीश आहेत. त्यांनी आपल्या निवडणूक उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती समोर आली आहे.

उन्मेष पाटील यांच्याकडे जंगम व स्थावर मालमत्ता मिळून सव्वा कोटींची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. उन्मेष पाटील यांच्याकडे २०१४ मध्ये सुमारे ७४ लाख रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता होती. आता २०१९ मध्ये त्यांची मालमत्ता तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची आहे. त्यात जंगम मालमत्ता ९४ लाख ४३ हजार ६०४ रुपये तर स्थावर मालमत्ता ३१ लाख २६ हजार १०० रुपये इतकी आहे. तर पाटील यांच्यावर २५ लाख २९ हजार ९५४ रुपये कर्ज आहे. शिवाय त्यांच्याकडे ३६ लाख २ हजार १०८ रुपये किंमतीची आलिशान फोर्ड इंडिव्हर कार आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या नावे ४० ग्रॅम व पत्नीच्या नावे २५० ग्रॅम सोने-चांदीचे दागिने आहेत.

एकही गुन्हा दाखल नाही-

४१ वर्षे वय असलेले उन्मेष पाटील यांचे बी.ई पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Intro:Feed send to FTP
जळगाव
जळगाव लोकसभा मतदारसंघात विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांचा पत्ता कापून ऐनवेळी उमेदवारी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झालेले भाजपचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हेदेखील कोट्यधीश असल्याचे त्यांनी आपल्या निवडणूक उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावरून समोर आले आहे.Body:उन्मेष पाटील यांच्याकडे जंगम व स्थावर मालमत्ता मिळून सव्वा कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. उन्मेष पाटील यांच्याकडे 2014 मध्ये सुमारे 74 लाख रूपयांची जंगम व स्थावर मालमत्ता होती. आता 2019 मध्ये त्यांची मालमत्ता तब्बल 1 कोटी 25 लाख रुपयांची आहे. त्यात जंगम मालमत्ता 94 लाख 43 हजार 604 रुपये तर स्थावर मालमत्ता 31 लाख 26 हजार 100 रुपये इतकी आहे. तर पाटील यांच्यावर 25 लाख 29 हजार 954 रुपये कर्ज आहे. शिवाय त्यांच्याकडे 36 लाख 2 हजार 108 रुपये किंमतीची आलिशान फोर्ड इंडिव्हर कार आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या नावे 40 ग्रॅम व पत्नीच्या नावे 250 ग्रॅम सोने-चांदीचे दागिने आहेत.Conclusion:एकही गुन्हा दाखल नाही-

41 वर्षे वय असलेले उन्मेष पाटील यांचे बी.ई. पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.