ETV Bharat / state

विधानसभेच्या निकालानंतर होणार एकनाथ खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचा फैसला

author img

By

Published : Oct 12, 2019, 6:11 PM IST

सन १९९० पासून सलग 6 वेळा या मतदारसंघात खडसे निवडून आले आहेत. त्यामुळेच त्यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. गेली ३० वर्षे या मतदारसंघातून सलग निवडून येत असलेले खडसे यांना यावेळी पक्षाने तिकीट नाकारले. विरोधी बाकावर असताना सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यात ३० वर्षे गेल्यानंतर जेव्हा सत्तेची फळे चाखण्याची वेळ आली, तेव्हा मात्र खडसेंच्या नशिबी 'वनवास' आला. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा खडसे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, महसूल मंत्रिपदावर त्यांची बोळवण झाली.

माजी मंत्री एकनाथ खडसे

जळगाव - मागच्या आठवड्यात जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या उमेदवारीवरून चर्चेत आला. उमेदवारीचा तिढा सुटल्यानंतर आता हा मतदारसंघ सेनेच्या पदाधिकाऱ्याने भाजपविरोधात केलेली उघड बंडखोरी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची राजकीय वाटचाल, अशा दोन विषयांवरून राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या मतदारसंघात भाजपने यावेळी खडसेंचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना रिंगणात उतरवले आहे. गेल्यावेळी एकनाथ खडसेंना चांगली टक्कर देणारे चंद्रकांत पाटलांचे त्यांना कडवे आव्हान आहे. या मतदारसंघाच्या निकालानंतर खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने फैसला होणार आहे. त्यामुळे मुक्ताईनगरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी, ५ जणांवर कारवाई

वर्षभराच्या आतच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. नंतर 'क्लीन चिट' मिळाली. मात्र, पुन्हा मंत्रिपदापासून ते वंचितच राहिले. ही खदखद मनात ठेवून खडसेंनी अनेकदा जाहीरपणे आपल्याच सरकारला खडेबोल सुनावले. त्याचाच परिपाक म्हणजे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यांच्याऐवजी पक्षाने कन्या रोहिणी खडसेंना तिकीट दिले आहे. भविष्यात खडसे डोईजड होऊ नये म्हणून भाजपने खडसेंचा पत्ता कापल्याचे जाणवत आहे. दुसरीकडे अंतर्गत स्पर्धेतून त्यांचे पंख छाटण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.

हेही वाचा - शिवसेनेत इनकमिंग सुरूच, राष्ट्रवादीच्या राज्य उपाध्यक्षांसह माजी नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

खडसेंचे राजकारण संपुष्टात येणार?

या निवडणुकीत जर रोहिणी खडसे यांना अपयश आले तर खडसेंचे ४० वर्षांचे राजकारणच संपुष्टात येण्याची भीती आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेशी युती तोडण्याचा निर्णय खडसेंनी जाहीर केला होता. तेव्हापासून शिवसेना खडसेंवर नाराज आहे. मात्र, युतीच्या तहात ही जागा भाजपकडे असल्याने सेनेचे चंद्रकांत पाटील यांची अडचण झाली. शिवाय भाजपने खडसे कुटुंबातच उमेदवारी दिल्याने त्यांनी सेनेच्या पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली. चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या भूमिकेला ढाल करत राष्ट्रवादीने देखील खडसेंची कोंडी करण्याची संधी सोडली नाही.

हेही वाचा - पाच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी काय केले- शरद पवार

आपला अधिकृत उमेदवार मागे घेऊन राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पाटलांना खडसेंवर नाराज असलेले शिवसैनिक आणि राष्ट्रवादीची ताकद असा दुहेरी बूस्टर मिळाला आहे. खडसेंचे राजकारण संपविण्यासाठी भाजपने त्यांची उमेदवारी कापली. त्यानंतर युतीत मित्रपक्ष असलेल्या सेनेच्या पदाधिकाऱ्याने उघड बंडखोरी केली. हे कमी की काय प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेऊन रोहिणी खडसेंविरोधात असलेल्या बंडखोर उमेदवाराला पाठींबा देऊन खडसेंना अडचणीत आणण्याची खेळी केली आहे.

हेही वाचा - जळगावात तपासणी पथकाने पकडली २९ लाखांची संशयित रोकड

तगडी लढत होणार -

यावेळी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणी खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी एकनाथ खडसेंविरोधात चंद्रकांत पाटील अवघ्या 9 हजार मतांनी पराभूत झाले होते. आता तर खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रिंगणात आहेत. त्यांना कितपत कौल मिळतो, हे सांगता येत नाही. दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांच्यासाठी युवावर्ग, प्रभावी जनसंपर्क या जमेच्या बाजू आहेत. खडसेंच्या ३० वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. हा मुद्दाही प्रचारात केंद्रस्थानी आहे. त्याचा फटका रोहिणी खडसेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत यावेळची निवडणूक एकनाथ खडसेंचे राजकीय वर्चस्व ठरवणारी आहे.

Intro:जळगाव
मागच्या आठवड्यात जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या उमेदवारीवरून चर्चेत आला. उमेदवारीचा तिढा सुटल्यानंतर आता हा मतदारसंघ सेनेच्या पदाधिकाऱ्याने भाजपविरोधात केलेली उघड बंडखोरी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची राजकीय वाटचाल, अशा दोन विषयांवरून राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या मतदारसंघात भाजपने यावेळी खडसेंचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना रिंगणात उतरवले आहे. गेल्यावेळी एकनाथ खडसेंना चांगली टक्कर देणारे चंद्रकांत पाटलांचे त्यांना कडवे आव्हान आहे. या मतदारसंघाच्या निकालानंतर खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने फैसला होणार आहे. त्यामुळे मुक्ताईनगरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Body:सन १९९० पासून सलग सहा वेळा निवडून येणारे खडसे यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ. गेली ३० वर्षे या मतदारसंघातून सलग निवडून येत असलेले खडसे यांना यावेळी पक्षाने तिकीट नाकारले. विराेधी बाकावर असताना सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यात ३० वर्षे गेल्यानंतर जेव्हा सत्तेची फळे चाखण्याची वेळ अाली, तेव्हा मात्र खडसेंच्या नशिबी 'वनवास' अाला. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा खडसे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार हाेते. मात्र, महसूल मंत्रिपदावर त्यांची बाेळवण झाली. वर्षभराच्या अातच भ्रष्टाचाराच्या अाराेपांमुळे त्यांना मंत्रिपद साेडावे लागले. नंतर 'क्लीन चिट' मिळाली, पण पुन्हा मंत्रिपदापासून ते वंचितच राहिले. ही खदखद मनात ठेवून खडसेंनी अनेकदा जाहीरपणे अापल्याच सरकारला खडेबाेल सुनावले. त्याचाच परिपाक म्हणजे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यांच्याऐवजी पक्षाने कन्या रोहिणी खडसेंना तिकीट दिले आहे. भविष्यात खडसे डोईजड होऊ नये म्हणून भाजपने खडसेंचा पत्ता कापल्याचे जाणवत आहे. दुसरीकडे अंतर्गत स्पर्धेतून त्यांचे पंख छाटण्यात अाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये अाहे.

खडसेंचे राजकारण संपुष्टात येणार?

या निवडणुकीत जर रोहिणी खडसे यांना अपयश आले तर खडसेंचे ४० वर्षांचे राजकारणच संपुष्टात येण्याची भीती आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेेेनेशी युती ताेडण्याचा निर्णय खडसेंनी जाहीर केला हाेता. तेव्हापासून शिवसेना खडसेंवर नाराज अाहे. मात्र, युतीच्या तहात ही जागा भाजपकडे असल्याने सेनेचे चंद्रकांत पाटील यांची अडचण झाली. शिवाय भाजपने खडसे कुटुंबातच उमेदवारी दिल्याने त्यांनी सेनेच्या पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली. चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या भूमिकेला ढाल करत राष्ट्रवादीने देखील खडसेंची कोंडी करण्याची संधी सोडली नाही. आपला अधिकृत उमेदवार मागे घेऊन राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पाटलांना खडसेंवर नाराज असलेले शिवसैनिक आणि राष्ट्रवादीची ताकद असा दुहेरी बूस्टर मिळाला आहे. खडसेंचे राजकारण संपविण्यासाठी भाजपने त्यांची उमेदवारी कापली. त्यानंतर युतीत मित्रपक्ष असलेल्या सेनेच्या पदाधिकाऱ्याने उघड बंडखोरी केली. हे कमी की काय प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेऊन रोहिणी खडसेंविरोधात असलेल्या बंडखोर उमेदवाराला पाठींबा देऊन खडसेंना अडचणीत आणण्याची खेळी केली आहे.Conclusion:तगडी लढत होणार-

यावेळी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणी खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी एकनाथ खडसेंविरोधात चंद्रकांत पाटील अवघ्या नऊ हजार मतांनी पराभूत झाले होते. आता तर खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रिंगणात आहेत. त्यांना कितपत कौल मिळतो, हे सांगता येत नाही. दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांच्यासाठी युवावर्ग, प्रभावी जनसंपर्क या जमेच्या बाजू आहेत. खडसेंच्या ३० वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. हा मुद्दाही प्रचारात केंद्रस्थानी आहे. त्याचा फटका रोहिणी खडसेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत यावेळची निवडणूक एकनाथ खडसेंचे राजकीय वर्चस्व ठरवणारी आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.