ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्याला मिळाले सहा नवीन तहसीलदार - Jalgaon tahasildar news

जळगाव जिल्ह्याला सहा नवीन तहसीलदार मिळणार आहे. जिल्ह्यातील यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव (संजय गांधी योजना) येथील तहसीलदारांच्या तर फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या बदल्या महसूल व वनविभागाचे उपसचिव माधव यांच्या स्वाक्षरी आदेशाने करण्यात आल्या आहेत.

Jalgaon district
Jalgaon district
author img

By

Published : Oct 2, 2020, 10:20 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव (संजय गांधी योजना) येथील तहसीलदारांच्या तर फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या बदल्या महसूल व वनविभागाचे उपसचिव माधव यांच्या स्वाक्षरी आदेशाने करण्यात आल्या आहेत. या तहसीलदारांच्या जागेवर ४ नवीन तहसीलदार तर रिक्त जागी दोन असे सहा नवीन तहसीलदार जिल्ह्याला मिळणार आहेत.

फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांची अहमदनगर येथे विशेष भुसंपादनअधिकारी वर्ग १ म्हणून बदली करण्यात आली आहे. यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी योजनेच्या तहसीलदारपदी बदली झाली आहे. मुक्ताईनगरचे तहसीलदार शाम वाडकर यांची पाथर्डी (जि.अहमदनगर) येथे बदली झाली आहे. तर यावलच्या तहसीलदारपदी अहमदनगर येथून महेश पवार यांची नियुक्ती झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त महसूल तहसीलदारपदी तळोदा (जि.नंदुरबार) येथील पंकज लोखंडे यांची बदली झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या रिक्त तहसीलदारपदी मालेगाव येथील सुरेश थोरात, जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शुल्क तहसीलदारपदी नंदुरबारचे मुकेश हिवाळे यांची नियुक्ती झाली आहे. चोपडा येथील तहसीलदारपदी नाशिकचे छगन वाघ यांची बदली झाली आहे. जळगाव संजय गांधी योजनेच्या तहसीलदार श्‍वेता संचेती यांची मुर्क्ताईनगर तहसीलदार पदी बदली झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.