ETV Bharat / state

जळगाव जिल्हा भाजपची जंबो कार्यकारिणी जाहीर - जळगाव भाजप घडामोडी

भारतीय जनता पक्षाची जळगाव जिल्हा ग्रामीणची जम्बो जिल्हा कार्यकारणी माजी जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ग्रामीण आमदार राजूमामा भोळे यांनी जाहीर केली. यामध्ये १२ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ११ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १ कार्यालय मंत्री, ६० सदस्य, कायम निमंत्रित सदस्य असा समावेश आहे.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Feb 12, 2021, 4:47 PM IST

जळगाव - जिल्हा ग्रामीण भाजपची जंबो कार्यकारिणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाची जळगाव जिल्हा ग्रामीणची जम्बो जिल्हा कार्यकारणी माजी जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ग्रामीण आमदार राजूमामा भोळे यांनी जाहीर केली. यामध्ये १२ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ११ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १ कार्यालय मंत्री, ६० सदस्य, कायम निमंत्रित सदस्य असा समावेश आहे.

यांची केली नियुक्ती-

कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी पी. सी.पाटील, पद्माकार महाजन, राकेश पाटील, डी.एस.चव्हाण, अजय भोळे, के.बी.साळुंखे, कांचन फालक, महेश पाटील, नंदकिशोर महाजन, रेखा चौधरी, भरत महाजन, डॉ.विजय धांडे यांचा समावेश आहे. सरचिटणीस पदी सचिन पानपाटील, मधुकर काटे, हर्षल पाटील, चिटणीस पदी नवलसिंग राजपूत, कविता महाजन, सविता भालेराव, अ‍ॅड. प्रशांत पालवे, राजेंद्र चौधरी, संतोष खोरखेडे, रंजना नेवे, रवींद्र पाटील, मेघा जोशी, सोमनाथ पाटील, शैलेजा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यांनी केले अभिनंदन-

यासोबत कोषाध्यक्षपदी अनिल खंडेलवाल, कार्यालय मंत्री पदी गणेश भगवान माळी यांना जबाबदारी देण्यात आली असून ६० कार्यकारणी सदस्य जाहीर करण्यात आले आहेत. या सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदूलाल पटेल, महाराष्ट्र राज्य जनजाती संपर्क प्रमुख किशोर काळकर, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर यांनी अभिनंदन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.