ETV Bharat / state

जळगाव : जिल्हा प्रशासन सज्ज, एरंडोलचा निकाल सर्वात आधी तर जळगाव शहरचा शेवटी लागणार - विधानसभा निवडणुक रिझल्ट

विधानसभेसाठी जिल्ह्यातील ११ मतदारसंघामध्ये २१ ऑगस्टला ६०.९० टक्के मतदान झाले आहे. आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतमोजणीची प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ३ हजार ५८६ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममधील मतमोजणी ११ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर होणार आहे.

जळगाव : जिल्हा प्रशासन सज्ज, एरंडोलचा निकाल सर्वात आधी तर जळगाव शहरचा शेवटी लागणार
author img

By

Published : Oct 23, 2019, 8:12 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या (गुरूवारी) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात १४ टेबल असणार असून एका राउंडला १४ मतदान केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे. दरम्यान, सर्वाधिक २६ राउंड जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे तर सर्वात कमी एरंडोल मतदारसंघाचे (२१ राउंड) होणार आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. एरंडोलच्या फेऱ्या कमी असल्याने येथील निकाल सर्वप्रथम तर फेऱ्या जास्त असल्याने जळगावचा निकाल शेवटी जाहीर होऊ शकतो.

विधानसभेसाठी जिल्ह्यातील ११ मतदारसंघामध्ये २१ ऑगस्टला ६०.९० टक्के मतदान झाले आहे. आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतमोजणीची प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ३ हजार ५८६ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममधील मतमोजणी ११ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर होणार आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील ३ हजार ६१० बीयू, ३ हजार ६१० सीयू व ३ हजार ७२७ व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान, मतदान प्रक्रियेदरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघातील मशीन बंद पडल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या मशीन बदलून देण्यात आलेल्या आहेत. अशा बिघाड झालेल्या २४ बॅलेट युनीट, २४ कंट्रोल युनीट व १४१ व्हीव्हीपॅटमधीलही मतमोजणी करण्यात येणार आहे.

एका टेबलवर तीन अधिकारी -

मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबल राहतील. एका राउंडला १४ केंद्रांमधील ईव्हीएममधील मतमोजणी करण्यात येईल. प्रत्येकी एका टेबलवर एक सुपरवायझर, सहायक व सुक्ष्म निरीक्षक राहतील. रँडम पद्धतीने एका टेबलवर पाच व्हीव्हीपॅट मोजले जातील. डाटा एकत्रिकरणासाठी चार कर्मचारी राहतील. मतमोजणीबरोबर सुविधा प्रणालीवर डाटा इंट्री करण्यात येणार आहे. या मतमोजणीबरोबर पोस्टल बॅलेटचीही मोजणी सुरू राहील.

मतमोजणीसाठी जिल्ह्यात १२५० अधिकारी, कर्मचारी-

मतमोजणी केंद्राला केंद्रीय सुरक्षा बल, राज्य राखीव दल व राज्य पोलीस असा त्रिस्तरीय बंदोबस्त लावला आहे. प्रत्येक मतदारसंघात १७६ सुपरवायझर व १७६ सहायक, ८८ टॅब्युलेशन कर्मचारी, ४४ सुविधा कर्मचारी, ५५ पोस्टल मतमोजणी सहायक, २२० सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर डाटा इंट्री, सूक्ष्म निरीक्षक, ईव्हीएम सिलिंग टीम, शिपाई असे एकूण १ हजार २५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची ११ मतदारसंघात नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरुन राजपत्रित अधिकाऱ्यांचा ईव्हीएम रँडम स्टॉप जिल्हास्तरावरुन जाणार आहे.

जळगाव शहर, ग्रामीण व चाळीसगावमध्ये सर्वाधिक फेऱ्या-
सर्वात कमी २९० मतदान केंद्र हे एरंडोल मतदारसंघात आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल सर्वात अगोदर लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर भुसावळ, रावेर या मतदारसंघातील निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा व अमळनेर या मतदारसंघांचे निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर फेऱ्या जास्त असलेले जळगाव ग्रामीण, चाळीसगाव व जळगाव शहर असे निकाल जाहीर होणार आहेत. सर्वाधिक ३९४ मतदान केंद्र हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात मतमोजणीच्या २६ फेऱ्या होणार आहेत.

Intro:जळगाव
विधानसभा निवडणुकीसाठी त्या-त्या मतदारसंघातील स्ट्राँग रुममध्ये २४ ऑक्टोबर राेजी सकाळी ८ वाजेपासून मतमाेजणीला सुरुवात हाेणार आहे. मतमाेजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात १४ टेबल असणार असून एका राउंडला १४ मतदान केंद्रांवरील मतमाेजणी होणार आहे. सर्वाधिक २६ राउंड जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे तर सर्वात कमी एरंडाेल मतदारसंघाचे २१ राउंड हाेणार आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट हाेणार आहे. एरंडाेलच्या फेऱ्या कमी असल्याने येथील निकाल सर्वप्रथम तर फेऱ्या जास्त असल्याने जळगावचा निकाल शेवटी जाहीर हाेऊ शकताे.Body:विधानसभेसाठी जिल्ह्यातील ११ मतदारसंघामध्ये २१ ऑगस्ट राेजी ६०.९० टक्के मतदान झाले आहे. आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतमाेजणीची प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ३ हजार ५८६ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममधील मतमाेजणी ११ विधानसभा मतदारसंघातील मतमाेजणी केंद्रावर हाेणार आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील ३ हजार ६१० बीयू, ३ हजार ६१० सीयू व ३ हजार ७२७ व्हीव्हीपॅटमधील मतमाेजणी करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघातील मशीन बंद पडल्या हाेत्या. त्यामुळे दुसऱ्या मशीन बदलून देण्यात आलेल्या आहेत. अशा बिघाड झालेल्या २४ बॅलेट युनीट, २४ कंट्राेल युनीट व १४१ व्हीव्हीपॅटमधीलही मतमाेजणी करण्यात येणार आहे.

एका टेबलवर तीन अधिकारी-

मतमाेजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबल राहतील. एका राउंडला १४ केंद्रांमधील ईव्हीएममधील मतमाेजणी करण्यात येईल. प्रत्येकी एका टेबलवर एक सुपरवायझर, सहायक व सूक्ष्म निरीक्षक राहतील. रँडम पद्धतीने एका टेबलवर पाच व्हीव्हीपॅट माेजले जातील. डाटा एकत्रिकरणासाठी चार कर्मचारी राहतील. मतमाेजणीबराेबर सुविधा प्रणालीवर डाटा इंट्री करण्यात येणार आहे. या मतमाेजणीबराेबर पाेस्टल बॅलेटचीही माेजणी सुरू राहील.

मतमाेजणीसाठी जिल्ह्यात १,२५० अधिकारी, कर्मचारी-

मतमाेजणी केंद्राला केंद्रीय सुरक्षा बल, राज्य राखीव दल व राज्य पाेलीस असा त्रिस्तरीय बंदाेबस्त लावला आहे. प्रत्येक मतदारसंघात १७६ सुपरवायझर व १७६ सहायक, ८८ टॅब्युलेशन कर्मचारी, ४४ सुविधा कर्मचारी, ५५ पाेस्टल मतमाेजणी सहायक, २२० सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. त्याचबराेबर डाटा इंट्री, सूक्ष्म निरीक्षक, ईव्हीएम सिलिंग टीम, शिपाई असे एकूण १ हजार २५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची ११ मतदारसंघात नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरुन राजपत्रित अधिकाऱ्यांचा ईव्हीएम रँडम स्टाॅप जिल्हास्तरावरुन जाणार आहे.Conclusion:जळगाव शहर, ग्रामीण व चाळीसगावमध्ये सर्वाधिक फेऱ्या-

सर्वात कमी २९० मतदान केंद्र हे एरंडाेल मतदारसंघात आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल सर्वात अगाेदर लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर भुसावळ, रावेर या मतदारसंघातील निकाल जाहीर हाेणार आहेत. त्यानंतर मुक्ताईनगर, जामनेर, चाेपडा व अमळनेर या मतदारसंघांचे निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर फेऱ्या जास्त असलेले जळगाव ग्रामीण, चाळीसगाव व जळगाव शहर असे निकाल जाहीर हाेणार आहेत. सर्वाधिक ३९४ मतदान केंद्र हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात मतमाेजणीच्या २६ फेऱ्या हाेणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.