ETV Bharat / state

जळगाव मनपा सत्तासंघर्ष : निवडीची सभा सभागृहात घ्यावी म्हणून भाजपची खंडपीठात धाव, आज सुनावणी होणार

author img

By

Published : Mar 17, 2021, 2:26 PM IST

महापौर व उपमहापौर निवडीच्या अनुषंगाने जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रत्येक दिवशी जोरदार घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी भाजपचे २५ पेक्षा अधिक नगरसेवक बंडखोरी करत शिवसेनेच्या बाजूने झुकले आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या असून, आता भाजपने शिवसेनेच्या वाटेत कायदेशीर अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

jalgaon mnc
जळगाव मनपा

जळगाव - महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीची सभा ही नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहूनच घेण्यात यावी, या मागणीसाठी भाजपने खंडपीठात धाव घेतली आहे. भाजपच्या दोन नगरसेवकांनी या संदर्भात खंडपीठात याचिका दाखल केली असून, त्यावर आज (बुधवारी) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महापौर व उपमहापौर निवडीच्या अनुषंगाने जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रत्येक दिवशी जोरदार घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी भाजपचे २५ पेक्षा अधिक नगरसेवक बंडखोरी करत शिवसेनेच्या बाजूने झुकले आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या असून, आता भाजपने शिवसेनेच्या वाटेत कायदेशीर अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. महापौर व उपमहापौर निवडीची सभा ही ऑनलाईन पद्धतीने झाल्यास आपल्याला फटका बसू शकतो, ही शक्यता गृहीत धरून भाजपने आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. दरम्यान, आज खंडपीठात न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्या पिठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे.

जळगाव महापालिकेसाठी वेगळा नियम का?

पिंपरी-चिंचवड व नागपूर महापालिकेप्रमाणेच जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच सर्व नगरसेवकांना सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहूनच घेण्यात यावी, अशी भाजपची मागणी आहे. याबाबतची याचिका भाजप नगरसेवक रंजना विजय सोनार व विश्वनाथ सुरेश खडके यांनी ऍड. अमरजितसिंग गिरासे यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली. पिंपरी-चिंचवड व नागपूर महापालिकेची निवडणूक ही ऑफलाईन पार पडलेली असताना जळगाव महापालिकेला वेगळा न्याय का? असे याचिककर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याच अर्थाची एक याचिका विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडेही दाखल केली आहे.

हेही वाचा - जळगाव सत्तासंघर्ष : शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन; उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे अर्ज दाखल

संख्याबळाबाबत सुरू आहेत दावे-प्रतिदावे-

महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता निवडणुकीला अवघे काही तास उरलेले असताना भाजप व शिवसेनेकडून संख्याबळाबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. भाजपतून फुटलेल्या नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार अडचणीत आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तर शिवसेनेकडून आवश्यक दोन तृतीयांश संख्याबळाची (म्हणजेच एकूण 38) जमवाजमव सुरू आहे. निवडणुकीवेळी आमच्याकडे आवश्यक संख्याबळ असेल, असा शिवसेनेचा दावा आहे.

बंडखोर नगरसेवक ठाण्यात तर भाजपचे नाशकात -

निवडणुकीपूर्वी बंडखोरी करून नॉट रिचेबल झालेले भाजपचे २५ पेक्षा अधिक नगरसेवक हे शिवसेनेच्या नेत्यांसोबत आहेत. त्यांना ठाण्यातील एका पंचतारांकित हॉटेलात ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना नेते गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दुसरीकडे, भाजपकडे उरलेले नगरसेवक देखील खबरदारी म्हणून नाशिक व इगतपुरी येथील हॉटेलात आहेत. आता काहीही दगाफटका होऊ नये म्हणून भाजप सावध पावले टाकत आहे.

हेही वाचा - जळगाव भाजपमध्ये बंडखोरी, ९ नगरसेवकांनी बांधले शिवबंधन!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.