ETV Bharat / state

जळगावच्या विमानसेवेची सुरुवात लांबणीवर; अहमदाबाद विमानतळावर जागा उपलब्ध नसल्याचे कारण - हैदराबाद

अहमदाबाद विमानतळाचे पुनर्निर्माणाचे काम सुरू असल्याने तेथे जागा उपलब्ध नसल्याचे ट्रु-जेट कंपनीला कळवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रु-जेटतर्फे विमानसेवा सुरू करण्यात अडचणी आल्या आहेत. जळगावची विमानसेवा १ सप्टेंबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

जळगाव विमानतळ
author img

By

Published : Jul 31, 2019, 4:27 PM IST

जळगाव- अहमदाबाद विमानतळावर पार्किंग स्लॉट उपलब्ध नसल्याने शहरातील खंडित झालेली विमानसेवा सुरू होण्यात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत. १ ऑगस्टचा मुहूर्त हुकणार असल्याने विमानसेवा सुरु होणे लांबणीवर पडले आहे.

जळगाव विमानतळ

मागील दोन वर्षांपूर्वी एअर डेक्कन चार्टर्स सर्व्हिसेस या कंपनीतर्फे पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव-मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच ही सेवा खंडित झाली. तेव्हापासून जळगावातून विमानसेवा बंद आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हैदराबाद येथील ट्रु-जेट या कंपनीला दुसऱ्या टप्प्यातील विमान सेवेला परवानगी मिळाली आहे. ट्रु-जेट कंपनीतर्फे अहमदाबाद-जळगाव व जळगाव-मुंबई अशी आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा पुरवण्यात येणार आहे.

विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपनीतर्फे १५ जणांचा स्टाफ नियुक्त करण्यात आला असून त्यांना हैदराबाद येथील मुख्यालयात प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंपनीतर्फे जळगाव विमानतळावर संगणक कक्ष, तिकीट खिडकी आदी सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ते परवाने प्राप्त झाले आहेत.

कंपनीला विमान पार्किंगसाठी अहमदाबाद विमानतळावर जागा हवी आहे. त्यासाठी कंपनीतर्फे अहमदाबाद विमानतळ संचालकांना रितसर पत्रही दिले आहे. मात्र, अहमदाबाद विमानतळाचे पुनर्निर्माणाचे काम सुरू असल्याने तेथे जागा उपलब्ध नसल्याचे कंपनीला कळवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रु-जेटतर्फे विमानसेवा सुरू करण्यात अडचणी आल्या आहेत. दरम्यान, १ ऑगस्टला सुरू होणारी विमानसेवा आता पुढील महिन्यात म्हणजे १ सप्टेंबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

Intro:जळगाव
अहमदाबाद विमानतळावर पार्किंग स्लॉट उपलब्ध नसल्याने शहरातील खंडित झालेली विमानसेवा सुरू होण्यात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत. १ अाॅगस्टचा मुहूर्त हुकला असून विमानसेवा लांबणीवर पडली अाहे.Body:गेल्या दाेन वर्षांपूर्वी एअर डेक्कन चार्टर्स सर्व्हिसेस या कंपनीतर्फे पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी उडान याेजनेच्या पहिल्या टप्प्यातच जळगाव-मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात अाली.परंतु, अवघ्या काही महिन्यांतच ही सेवा खंडित झाली. तेव्हापासून जळगावातून विमानसेवा बंद अाहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हैद्राबाद येथील ट्रु-जेट या कंपनीला दुसऱ्या टप्प्यातील विमान सेवेला परवानगी मिळाली अाहे. ट्रु-जेट कंपनीतर्फे अमदाबाद-जळगाव व जळगाव-मुंबई अशी अाठवड्यातून सहा दिवस विमानसेवा पुरवण्यात येणार अाहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपनीतर्फे १५ जणांचा स्टाॅफ नियुक्त करण्यात अाला असून त्यांना हैद्राबाद येथील मुख्यालयात प्रशिक्षणही देण्यात अाले अाहे. त्याचप्रमाणे कंपनीतर्फे जळगाव विमानतळावर संगणक कक्ष, तिकीट खिडकी अादी सुविधाही करण्यात अाल्या अाहे. गेल्या पंधरवड्यात कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून सेवा सुरू करण्यासाठी अावश्यक त्या परवानग्याही प्राप्त झाल्या अाहेत. मात्र, कंपनीला विमान पार्किंगसाठी अहमदाबाद विमानतळावर जागा हवी अाहे. त्यासाठी कंपनीतर्फे अहमदाबाद विमानतळ संचालकांना रितसर पत्रही दिले अाहे; परंतु अहमदाबाद विमानतळाचे पूनर्निर्माणाचे काम सुरू असल्याने तेथे जागा उपलब्ध नसल्याबद्दल संचालकांनी कंपनीला कळवले अाहे. त्यामुळे ट्रु-जेटतर्फे विमानसेवा सुरू करण्यात अडचणी आल्या आहेत.Conclusion:दरम्यान, १ अाॅगस्टला सुरू हाेणारी विमानसेवा अाता पुढील महिन्यात म्हणजे १ सप्टेंबरनंतरच सुरू हाेण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात अाहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.