जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यावर एका महिलेच्या माध्यमातून हनीट्रॅप लावण्यात आला होता. परंतु, हा प्रकार वेळीच उघड झाला होता. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात हनीट्रॅपमध्ये सहभागी असणाऱ्या महिलेसह इतर साक्षीदार संशयित आरोपी आहेत.
हनीट्रॅप लावणाऱ्या महिलेने एका नगरसेवकाच्या सांगण्यावरुन स्वत: अभिषेक पाटील यांना या षडयंत्राविषयी माहिती दिली होती. मनोज वाणी नामक व्यक्तीने हा ट्रॅप लावलेला असल्याची माहिती अभिषेक पाटील यांनी दिली होती. राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी वाणी यांनी महिले द्वारे अश्लिल फोटो, व्हिडीओ मिळवण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर अभिषेक पाटील यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली होती. यानंतर चौकशीअंती पाटील यांच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी मनोज वाणी, शाकंभरी सुर्वे यांच्यासह त्यांचे साक्षीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.