जळगाव: जळगावात पत्रकारांशी बोलताना अॅड निकम (Adv. Ujjwal Nikam) यांनी मलिक यांच्या अटकेनंतरच्या न्यायालयीन प्रक्रिया (Court proceedings) कशी असेल याबाबतही माहिती दिली. मलिक यांच्याविरोधात ईडीने सकृतदर्शनी पुरावा गोळा केला आहे. तो सबळ आहे का ? तसेच मलिक यांच्याकडून काही बाबींवर समाधानकारक खुलासा न आल्याने याच्या आधारावर मलिक त्यांच्या कोठडीची मागणी होऊ शकते.
तसेच कुठलाच पुरावा नसताना मलिक यांच्यावर कारवाई केल्याबाबत तसेच थेट तसा पुरावा नसतानाही राजकीय खेळीतून ही कारवाई केल्याच मलिक यांच्या वकिलांकडून न्यायालयात सिद्ध करण्यात आले. ते न्यायालयीन कोठडी मागतील व त्यानंतर मलिक यांना जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऑक्टच्या कलम ५० नुसार प्रथम समंस पाठवावा लागतो. नंतर त्याचा जबाब घेण्यात येतो. यानुसार ईडीने कारवाई केली आहे का ? सबळ पुरावा असला तरच ईडी अटक करते. त्यामुळे ज्या पुराव्याच्या आधारावर मलिक यांना अटक झाली तो पुरावा किती सबळ आहे. हे न्यायालयात स्पष्ट होईल. सध्या ही कारवाई कायदेशीर व बेकायदेशीर अशा चर्चा रंगत असल्या तरी न्यायालय काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे असल्याचेही यावेळी ऑड निकम म्हणाले.