ETV Bharat / state

जळगावात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणारे केंद्र शहराच्या मध्यभागी; पर्यावरणासह मानवी आरोग्याला धोका?

author img

By

Published : Dec 17, 2020, 3:31 PM IST

हॉलमार्किंग करणाऱ्या कारागिरांच्या आरोग्यालाही अपाय करू शकतात. इरेडियम, रुथेनियम तसेच रिनियम हे धातू मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून, त्यांच्यामुळे कारागिराला कर्करोगाचा तसेच फुफ्फुसांचा संसर्ग होण्याची भीती असते. ही परिस्थिती लक्षात घेता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणाऱ्या केंद्रांसाठी सुरक्षेची 'एसओपी' असणे गरजेचे आहे.

जळगावात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणारे केंद्र शहराच्या मध्यभागी; पर्यावरणासह मानवी आरोग्याला धोका?
जळगावात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणारे केंद्र शहराच्या मध्यभागी; पर्यावरणासह मानवी आरोग्याला धोका?

जळगाव - सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करण्याच्या प्रक्रियेमुळे पर्यावरणासह मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती असते. जळगाव शहरात हॉलमार्किंग करणारी केंद्र शहराच्या मध्यभागी असल्याने पर्यावरणाचा समतोल आणि मानवी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग प्रक्रिया ही पूर्णपणे सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होत असल्याने त्यात कुठेही पर्यावरणाची हानी किंवा मानवी आरोग्यास अपाय होत नसल्याचा दावा हॉलमार्किंग केंद्रचालकांनी केला आहे.

सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळावेत, या उद्देशाने सोन्याचे दागिने विक्री करण्यापूर्वी त्यावर हॉलमार्किंग करणे प्रत्येक ज्वेलर्सला केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. हॉलमार्किंग प्रक्रियेमुळे ग्राहकांची ज्वेलर्सकडून होणारी फसवणूक टाळता येऊ शकते. मात्र, सोन्याच्या दागिन्यांमध्ये काही प्रमाणात असणारे इरेडियम, रुथेनियम तसेच रिनियम हे धातू मानवी आरोग्यासाठी अपायकारक मानले जातात. दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्याच्या प्रक्रियेत हे धातू भट्टीत वितळले तर ते वायुरूपात हवेत मिसळले जाऊन पर्यावरणाची हानी तर करतातच, शिवाय दागिन्यांवर हॉलमार्किंग करणाऱ्या कारागिरांच्या आरोग्यालाही अपाय करू शकतात. इरेडियम, रुथेनियम तसेच रिनियम हे धातू मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून, त्यांच्यामुळे कारागिराला कर्करोगाचा तसेच फुफ्फुसांचा संसर्ग होण्याची भीती असते. ही परिस्थिती लक्षात घेता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणाऱ्या केंद्रांसाठी सुरक्षेची 'एसओपी' असणे गरजेचे आहे.

काय असते हॉलमार्किंग प्रक्रिया?

सोन्याचे दागिने खरेदीवेळी ज्वेलर्सकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे ज्वेलर्सला बंधनकारक केले आहे. सोन्याचा कोणताही दागिना विक्री करण्यापूर्वी त्यावर शासनमान्य हॉलमार्किंग केंद्राकडून हॉलमार्किंग करून घ्यावे लागते. सोन्यात 18 व 22 कॅरेट अशा दोन प्रकारच्या प्युरिटी आहेत. हॉलमार्किंग प्रक्रियेत दागिन्यात सोन्याचे प्रमाण निश्चित होऊन ते सोने 18 कॅरेट आहे किंवा 22 कॅरेट आहे, हे स्पष्ट होते. 22 कॅरेटमध्ये 91.60 टक्के तर 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोने असते. हॉलमार्किंग झालेल्या दागिन्यावर पाच प्रकारचे लोगो असतात. त्यात बीआयएसचा (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) त्रिकोणी लोगो, दागिन्याचा कॅरेट दर्शवणारा, प्युरिटी दर्शवणारा, हॉलमार्किंग सेंटर आणि ज्वेलर्सचा लोगो असतो. हे पाचही लोगो ग्राहकाने दागिना खरेदी वेळी पडताळून पाहणे गरजेचे असते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दागिन्यांवर हॉलमार्किंग केली जाते.

हॉलमार्किंग केंद्रचालक म्हणतात, प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित -

जळगावात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्यारी दोन शासनमान्य केंद्र आहेत. शहरासह जिल्ह्यातील ज्वेलर्स याठिकाणी दागिन्यांवर हॉलमार्किंग करून घेतात. हॉलमार्किंग प्रक्रियेविषयी श्री आदिनाथ लॅबचे संचालक हर्षल संघवी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, हॉलमार्किंग प्रक्रिया ही पूर्णपणे सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत असल्याने त्यात कुठेही पर्यावरणाची हानी किंवा मानवी आरोग्यास अपाय होत नाही. सोन्याच्या दागिन्यात इरेडियम, रुथेनियम आणि रिनियम हे धातू असतात. हे धातू मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने सरकारने त्यांच्या भट्टी प्रक्रियेवर बंदी घातली आहे. हे धातू सोन्याच्या दागिन्यांमध्ये नसावेत, असा नियम आहे. जर हे धातू सोन्याच्या दागिन्यांमध्ये असले तर दागिने घडवताना जी प्रक्रिया होते, त्यात कारागिराला कर्करोगाचा, फुफ्फुसांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो. दागिन्यांच्या हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत 'एक्सआरएफ प्रोसेस' म्हणजेच दागिन्यांमध्ये कोणते धातू आहेत, हे तपासण्याची प्रक्रिया सर्वात आधी होते. त्या दागिन्यात जर इरेडियम, रुथेनियम किंवा रिनियम हे धातू आढळले, तर तो दागिना हॉलमार्किंग प्रक्रियेसाठी रिजेक्ट केला जातो. म्हणजेच, हॉलमार्क होणारा प्रत्येक दागिना हा वरील तीनही धातू नसलेला असतो. म्हणून हॉलमार्किंग प्रक्रिया ही सुरक्षित असते, असे हर्षल संघवी म्हणाले.

हॉलमार्किंग प्रक्रिया सुरक्षित का आहे?

हर्षल संघवी यांनी हॉलमार्किंग प्रक्रिया सुरक्षित असल्याचे दुसरे कारण देताना सांगितले की, सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणाऱ्या प्रक्रियेतील भट्टीचे उच्चतम तापमान हे 1200 अंश सेल्सिअस असते. सोने हा धातू 1050 अंश सेल्सिअस तापमानात वितळतो. दुसरीकडे, सोन्यातील घातक असलेले इरेडियम, रुथेनियम आणि रिनियम हे धातू 1600 ते 1800 अंश सेल्सिअस तापमानात वितळतात. हे धातू हॉलमार्किंग प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातच आढळले तर तो दागिना तेथेच बाहेर काढला जातो. पुढच्या प्रक्रियेसाठी तो पात्र ठरत नाही. नजरचुकीने जर हे धातू दागिन्यात राहिले तरी ते 1200 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत कायम राहतील, या तापमानात ते वितळत नाहीत, किंवा त्यांचे वायुरूपात रूपांतर होत नाही. त्यामुळे या धातूंच्या माध्यमातून पर्यावरणाला धोका निर्माण होईल किंवा कारागिरांच्या आरोग्यास अपाय होईल, असे होऊच शकत नाही. याशिवाय आमच्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे नियंत्रण असल्याने हॉलमार्किंग प्रक्रियेतील बारकावे नियमानुसार तपासले जातात, असेही हर्षल संघवी यांनी सांगितले.

जुलै 2021 पासून देशभरातील ज्वेलर्सला हॉलमार्किंग होणार बंधनकारक -

सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने हॉलमार्किंग प्रक्रिया ज्वेलर्सला बंधनकारक केली आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक दागिना, मग तो अर्धा ग्रॅमचा असो किंवा एक तोळ्याचा असो त्याला हॉलमार्किंग करावे लागते. आता केंद्र सरकार जुलै 2021 पासून देशभरातील ज्वेलर्सला हॉलमार्किंग बंधनकारक करणार आहे. त्यामुळे हॉलमार्किंग शिवाय दागिना विकता येणार नाही, असे भंगाळे गोल्डचे संचालक आकाश भंगाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.