ETV Bharat / state

गुंतवणूकदारांना खुणावतेय सोन्याची बाजारपेठ; सोने-चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता - जागतिक बाजारपेठ

कोरोना विषाणूच्या थैमानामुळे शेअर मार्केट देखील खाली आले आहेत. अशा स्थितीत गुंतवणुकीचा शाश्वत मार्ग म्हणून गुंतवणूकदारांची पावले सोने-चांदीच्या बाजारपेठेकडे वळत आहेत.

Investment in Gold
सोने-चांदी गुंतवणूक
author img

By

Published : Mar 6, 2020, 9:39 AM IST

Updated : Mar 6, 2020, 10:36 AM IST

जळगाव - सध्या जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असल्याने जागतिक बाजारपेठ अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोने-चांदीची बाजारपेठ खुणावत आहे. या कारणांमुळेच सध्या सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात सोन्याचे दर 43 हजार 500 रुपये प्रतितोळा तर चांदीचे दर 46 ते 46 हजार 500 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचले आहेत.

गुंतवणूकदारांना खुणावतेय सोन्याची बाजारपेठ

जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्याचे दर दिवसेंदिवस नव्या विक्रमावर पोहचत आहेत. जळगावात सोने 44 हजार रुपये प्रतितोळ्याच्या उंबरठ्यावर आहे. 4 मार्चला सोन्याचे दर एकाच दिवशी 1 हजार 300 रुपयांनी वधारून 43 हजार 800 रुपयांवर गेले होते. चांदीचे दरही दिवशी 700 रुपयांनी वाढले होते. सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याने व्यापाऱ्यांचे अंदाज चुकत आहेत. दरम्यान, सोने आणि चांदीचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्यांना सोने-चांदी खरेदी करणे जवळपास अशक्य झाले आहे.

हेही वाचा - येस बँकेवर निर्बंध, एटीएमबाहेर रांगा, सणासुदीला ग्राहकांची आर्थिक कोंडी

कोरोना विषाणूच्या थैमानामुळे शेअर मार्केट देखील खाली आले आहे. अशा स्थितीत गुंतवणुकीचा शाश्वत मार्ग म्हणून गुंतवणूकदारांची पावले सोने-चांदीच्या बाजारपेठेकडे वळत आहेत. याच कारणामुळे सोने-चांदीचे दर प्रचंड अस्थिर आहेत. अशीच स्थिती कायम राहिली तर सोने लवकरच 50 हजारांवर झेपावेल, असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे.

Last Updated : Mar 6, 2020, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.