ETV Bharat / state

जळगाव : वाढीव वस्तीतील समस्या सोडवण्यासाठी उपमहापौरांच्या अधिकाऱ्यांना सूचना - उपमहापौर आपल्या दारी उपक्रम

'उपमहापौर आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत गुरुवारी उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ८ मध्ये भेट दिली. शहराचा वाढीव भाग असल्याने या परिसरात रस्ते, गटारं आणि पुरेसे पथदिवे नसल्याचे नागरिकांनी सांगितले. उपमहापौर सुनील खडके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत ज्या तत्काळ सोडवण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

jalgaon municipal corporation
जळगाव : वाढीव वस्तीतील समस्या सोडवण्यासाठी उपमहापौरांच्या अधिकाऱ्यांना सूचना
author img

By

Published : Dec 3, 2020, 6:03 PM IST

जळगाव - 'उपमहापौर आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत गुरुवारी उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ८ मध्ये भेट दिली. शहराचा वाढीव भाग असल्याने या परिसरात रस्ते, गटारं आणि पुरेसे पथदिवे नसल्याचे नागरिकांनी सांगितले. उपमहापौर सुनील खडके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत ज्या तत्काळ सोडवण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. खडके यांनी प्रभाग ८ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, प्रतिभा पाटील, अॅड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, अमित काळे, भारत कोळी, सुधीर पाटील, मनोज काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

jalgaon municipal corporation
जळगाव : वाढीव वस्तीतील समस्या सोडवण्यासाठी उपमहापौरांच्या अधिकाऱ्यांना सूचना
कचऱ्या संदर्भात उपाययोजना

आव्हाणे शिवारातील पवार पार्कच्या रहिवाशांनी डम्पिंग ग्राउंड ऐवजी कचरा रस्त्यावर टाकला जातो, अशी तक्रार केली. यानंतर उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच पवार पार्कमधील कर्मचारी साफसफाई करत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना देखील तंबी दिली. परिसरात रस्ते नसल्याने रस्त्यांसाठी डब्ल्यूबीएमचा प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सुचवले. पाण्याची गंभीर समस्या नागरिकांनी मांडल्यानंतर शहर अभियंता यांनी मार्च अखेरपर्यंत परिसराला नियमित पाणी पुरवठा होईल, अशी माहिती दिली.

सांडपाण्याच्या डबक्यातील पाणी निचरा होणार

आहुजा नगरातील वृंदावन सोसायटीजवळ असलेल्या एका मोकळ्या भूखंडात सांडपाणी जमा होऊन मोठे डबके तयार झाले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने त्याठिकाणी दलदल तयार होऊन मच्छर आणि सापांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. नागरिकांनी याबाबत उपमहापौरांना माहिती दिली. खडके यांनी शहर अभियंता अरविंद भोसले यांच्याशी चर्चा करून उद्याच जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी चारी खोदण्याचे सांगितले. तसेच मनुदेवी नगरातील मनपाच्या मोकळ्या जागेवर भर टाकून सपाटीकरण करण्याच्या सूचना देखील उपमहापौरांनी दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.