जळगाव - गेल्या 70 वर्षांमध्ये उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील व त्यानंतर गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, हा केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. गेल्या 70 वर्षांपासून उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद मिळावे ही मागणी सर्व पक्षांकडे करत आलो. मात्र 70 वर्षांत न्याय मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
हेही वाचा - Bhusawal Fire News : भुसावळमध्ये अपार्टमेंटमधील घराला मध्यरात्री लागली आग; अग्नीतांडवात वडिलांचा मृत्यू
मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे समजतात किती छळ केला जातो याचे जिवंत उदाहरण आपणच असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळेच मला बदनाम करून ईडीसारख्या तपास यंत्रणा माझ्या मागे लावल्याचे म्हणत एकनाथ खडसे यांनी आपला रोष पुन्हा व्यक्त केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एसटी विलिनीकरणाबाबत जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत 1 लाख संसार उद्ध्वस्त होतील, असे वक्तव्य करत राज्य सरकारला टोला लगावला होता. मात्र, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला एकनाथ खडसे यांनी समर्थन दिले असून, एसटी बंद असल्याने गेल्या वर्षभरात अधिक दुर्दैवी प्रसंग घडले आहे तर बोदवडमध्येही एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनांमुळेच चंद्रकांत दादांनी ही भीती व्यक्त केली असून, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी प्रयत्न केले. पण, ते कमी पडले आहे, एकनाथ खडसे म्हणाले. राज्य सरकारने अधिक प्रयत्न करून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला.
हेही वाचा - Paid Home Tax by Coins : जळगावातील एका रहिवाशाने चिल्लर देऊन केली जमा घरपट्टी