ETV Bharat / state

औद्योगिक क्षेत्राची घडी हळूहळू पूर्वपदावर; उत्पादनाची गती वाढवण्यावर उद्योजकांचा भर

उद्योग क्षेत्राची गती थांबल्याने त्यावर अवलंबून असलेल्या इतर घटकांवरही विपरित परिणाम झाला. जळगाव शहराव्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर, मॅन्युफॅक्‍चरिंग सेक्‍टरवर झालेल्या परिणामाचा आकडा कितीतरी पटींनी मोठा होता. जळगाव जिल्ह्यात जळगाव शहरासह अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ या शहरांमध्ये औद्योगिक वसाहत आहे. याशिवाय धरणगाव आणि बोदवड तालुक्यामध्ये जिनिंग व प्रेसिंग उद्योग मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. त्यावरही लॉकडाऊनमुळे परिणाम झाला. मात्र, आता जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राची घडी सुधारत आहे.

MIDC
एमआयडीसी
author img

By

Published : Oct 6, 2020, 4:53 PM IST

Updated : Oct 7, 2020, 10:19 AM IST

जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्राला सर्वात जास्त फटका बसला. मालाचे उत्पादन, ट्रान्सपोर्टेशन असे सर्व काही ठप्प झाल्याने औद्योगिक क्षेत्राचे अर्थकारणच मोडीत निघाले. जळगावातील औद्योगिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. लॉकडाऊनमुळे येथील औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. मात्र, आता 'मिशन बिगीन'चा नारा देत राज्य शासनाने प्रत्येक क्षेत्राला शिथिलता देण्यास सुरुवात केल्याने औद्योगिक क्षेत्राची विस्कटलेली घडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. येथील 600 ते 700 लहान-मोठ्या उद्योगांची चाके पुन्हा फिरू लागली असून, कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. आता उत्पादन वाढीवर उद्योजकांचा भर आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर डिसेंबरपर्यंत औद्योगिक क्षेत्राची गाडी रुळावर येईल, अशी आशा आहे.

जळगाव शहरात औरंगाबाद महामार्गावर विस्तीर्ण क्षेत्रावर औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी प्लास्टिक पाईप, ठिबक सिंचन साहित्य, चटई, पेपर निर्मिती, दाळमिल, तेल निर्मिती करणारे लहान-मोठे असे 600 ते 700 उद्योग आहेत. लॉकडाऊननंतरचे अडीच ते तीन महिने येथील कृषीपूरक तसेच अन्नपदार्थ निर्मिती करणारे उद्योग सोडले तर इतर उद्योग बंद होते. एका उद्योगाची महिनाभराची उलाढाल 10 ते 15 लाख रुपये गृहीत धरली तर या काळात ३५० ते ४०० कोटी रुपयांचे उत्पादन ठप्प झाले होते. लॉकडाऊनपूर्वी उत्पादित झालेला कोट्यवधी रुपयांचा माल बाजारपेठेत जाऊ शकला नाही. त्यामुळे लहान-मोठ्या उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण थांबले.

जळगावातील औद्योगिक क्षेत्राची घडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे

ट्रान्सपोर्टेशन(वाहतूक) सुरळीत झाल्याने आली गती -

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वात जास्त अडचणी मालाच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये आल्या. राज्यात जिल्हाबंदी असल्याने मालाच्या वाहतुकीसाठी शासनाने पासेस बंधनकारक केले होते. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यांवर अडचणी येत होत्या. त्यामुळे वाहतूकदार उद्योजकांना प्रतिसाद देत नव्हते. अनेक उद्योजकांनी लॉकडाऊनपूर्वी उत्पादित झालेला माल गोदामांमध्ये ठेवणेच पसंत केले. माल बाजारपेठेत न गेल्याने त्यांची देणीही अडकली. पर्यायाने अर्थकारणावर परिणाम झाला. आता मात्र, ट्रान्सपोर्टेशन सुरळीत झाल्याने औद्योगिक क्षेत्राला गती येऊ लागली आहे, अशी माहिती जळगावातील 'जिंदा' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

कामगार परतले, उत्पादनाचा वेग वाढला -

लॉकडाऊननंतर औद्योगिक क्षेत्र आता सावरत आहे. शासनाकडूनही आता अर्थकारण सुधारण्याच्या उद्देशाने प्रत्येक क्षेत्रात शिथिलता प्रदान केली जात आहे. अशीच परिस्थिती पुढेही कायम राहिली तर डिसेंबर महिन्यापर्यंत परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे. आता राज्यासह परराज्यातील कामगार देखील परतले आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीचे मुख्य लक्ष्य आहे. पूर्वी आमच्या कंपनीत 3 शिफ्टमध्ये काम चालायचे. आता कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून आम्ही 50 टक्के मनुष्यबळावर काम चालवत आहोत. दीड शिफ्टमध्ये उत्पादन सुरू आहे. ट्रान्सपोर्टेशन सुरळीत झाल्याने उत्पादित माल बाजारपेठेत जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आता राज्याबाहेरील ऑर्डर येऊ लागल्या आहेत. कच्चा माल देखील परराज्यातून आयात करता येत आहे. पूर्वीप्रमाणे गतीने उलाढाल नसली तरी उलाढाल सुरू आहे, याचे समाधान आहे. अशी माहिती उद्योजक रजनीकांत कोठारी यांनी दिली.

कृषीपूरक उद्योगांची गती वाढली -

जळगावातील औद्योगिक वसाहतीत ठिबक सिंचन साहित्य, शेती औजारे निर्मिती करणारे अनेक उद्योग आहेत. याशिवाय कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग देखील मोठ्या संख्येने आहेत. खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने दाळमिल, तेल निर्मिती आणि प्रक्रिया उद्योग गतीने सुरू झाले आहेत. याशिवाय आता पुढील महिन्यात रब्बी हंगामाची लगबग सुरू होईल. त्या अनुषंगाने कृषी औजारे आणि सूक्ष्मसिंचन साहित्य निर्मिती करणाऱ्या उद्योगांमध्येही निर्मितीला गती आली आहे.

नफ्याचा विचार नाही, अर्थचक्र रुळावर येण्याची अपेक्षा -

कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याला औद्योगिक क्षेत्र अपवाद नाही. मात्र, गेले 5 महिने खूप अडचणी पाहिल्यानंतर आता औद्योगिक क्षेत्रात आशा निर्माण झाली आहे. उत्पादन सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्ही सध्या नफ्याचा विचार नाही, तर अर्थचक्र रुळावर येण्याची वाट पाहत आहोत. उद्योगाची चाके थांबायला नकोत, ती सुरू राहिली पाहिजेत. टाकलेला खर्च निघाला तरी समाधान आहे. भविष्यात परिस्थिती सुधारेल, तेव्हा नफ्याचा विचार होऊ शकतो, असे मत उद्योजक धीरज पाटील यांनी मांडले.

Last Updated : Oct 7, 2020, 10:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.