ETV Bharat / state

भुसावळमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वित

भुसावळ शहरात असलेल्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आमदार निधीतून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे आज (शनिवारी) सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या ऑक्सिजन प्रकल्पामुळे भुसावळ शहरातील रुग्णसंख्येसाठी दररोज आवश्यक असलेला ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.

हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

author img

By

Published : May 1, 2021, 8:08 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहरात असलेल्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आमदार निधीतून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे आज (शनिवारी) सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या ऑक्सिजन प्रकल्पामुळे भुसावळ शहरातील रुग्णसंख्येसाठी दररोज आवश्यक असलेला ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भुसावळात आरोग्य यंत्रणेला काही अंशी दिलासा मिळणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. कोरोनाची दुसरी लाट तीव्र असल्याने रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. राज्यभर मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनची समस्या लक्षात घेऊन भुसावळ शहरातील ट्रामा केअर सेंटरमध्ये आमदार निधीतून 15 एमएमक्यूब क्षमतेचा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. जिल्ह्यातील हा पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 32 लाख रुपये खर्च आला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने भुसावळ शहरासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत आमदार संजय सावकारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, मनोज बियाणी आदींसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजन

यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भुसावळात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे, ही आनंदाची बाब आहे. येत्या काळात जळगाव जिल्ह्यामध्ये 10 कोटी रुपये खर्चून अशाचप्रकारचे प्रकल्प ठिकठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आम्ही आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी नियोजन करत आहोत. या प्रकल्पामुळे भुसावळ ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होईल. भुसावळकरांसाठी भविष्यातील नियोजन म्हणून 1 कोटी 9 लाख रुपयांच्या निधीचे अंदाजपत्रक तयार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - 'लस सुरूवातीला परदेशात देण्याची काहीच गरज नव्हती'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.