ETV Bharat / state

सक्तवसुली संचालनालयाला चौकशीत सहकार्य करणार- ईश्वरलाल जैन - ईश्वरलाल जैन

शिखर बँकेत संचालक असताना आपण एक रुपया देखील घेतलेला नाही. साधे मानधन सुध्दा तेव्हा मी घेतले नाही. बँकेचे वाहन वापरले नाही किंवा रेस्ट हाऊसचा फायदा घेतला नाही. तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सक्तवसुली संचालनालयाला चौकशीत सहकार्य करणार- ईश्वरलाल जैन
author img

By

Published : Sep 25, 2019, 9:53 PM IST

जळगाव - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (शिखर बँक) कोट्यवधी रुपयांच्या कर्ज वितरण गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बँकेच्या संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचाही समावेश आहे. बुधवारी जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपण सक्तवसुली संचालनालयाला चौकशीत सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

सक्तवसुली संचालनालयाला चौकशीत सहकार्य करणार- ईश्वरलाल जैन

हे ही वाचा - ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार, पवारांनी केले स्पष्ट

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला वठणीवर आणण्यासाठी शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यामुळे आत्ताच्या सरकारला दोष देता येणार नाही. शिखर बँकेत संचालक असताना आपण एक रुपया देखील घेतलेला नाही. साधे मानधन सुध्दा तेव्हा मी घेतले नाही. बँकेचे वाहन वापरले नाही किंवा रेस्ट हाऊसचा फायदा घेतला नाही. तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असे ईश्वरलाल जैन यांनी सांगितले. संचालक मंडळाने कर्ज देण्याचे निर्णय घेणे, हा गुन्हा आहे का? असा प्रश्न देखील जैन यांनी उपस्थित केला. सक्तवसुली संचालनालयाने मला चौकशीसाठी बोलावले तर मी नक्की चौकशीला सामोरे जाईल, असेही ते म्हणाले.

शरद पवारांचे नाव का गोवले?

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव का गोवले? हेच समजत नाही. कारण शरद पवार हे कधीही या बँकेचे सभासद नव्हते. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचालनालय देऊ शकते, असेही यावेळी जैन यांनी सांगितले.

Intro:जळगाव
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (शिखर बँक) कोट्यवधी रुपयांच्या कर्ज वितरण गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बँकेच्या संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचाही समावेश आहे. बुधवारी जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपण सक्तवसुली संचालनालयाला चौकशीत सहकार्य करणार असल्याचे सांगितले.Body:ईश्वरलाल जैन पुढे म्हणाले, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला वठणीवर आणण्यासाठी शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यामुळे आताच्या सरकारला दोष देता येणार नाही. शिखर बँकेत संचालक असताना आपण 1 रुपयाचे देखील लिंपीत नाही. साधे मानधन सुध्दा तेव्हा मी घेतले नाही. बँकेचे वाहन वापरले नाही किंवा रेस्ट हाऊसचा फायदा घेतला नाही. तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संचालक मंडळाने कर्ज देण्याचे निर्णय घेणे, हा गुन्हा आहे का? असा प्रश्न देखील जैन यांनी उपस्थित केला. सक्तवसुली संचालनालयाने मला चौकशीसाठी बोलावले तर मी नक्की चौकशीला सामोरे जाईल, असेही ते म्हणाले. Conclusion:शरद पवारांचे नाव का गोवले?

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव का गोवले? हेच समजत नाही. कारण शरद पवार हे कधीही या बँकेचे सभासद नव्हते. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला, याचे उत्तर फक्त सक्तवसुली संचालनालय देऊ शकते, असेही यावेळी जैन यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.