ETV Bharat / state

अंबानींना नोटीस दिली, ते पक्षाला पटले नाही, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

यावेळी ते म्हणाले, की मुंबईत एका बड्या हस्तीने एक हजार कोटींची वक्फ बोर्डाची अनाथालयासाठी राखीव असलेली जमीन हडप केली. आपण त्याला वक्फ बोर्डाच्या या जमिनीच्या मोबदल्यात एक हजार कोटी रुपये भरण्याची नोटीस दिली होती. ती हस्ती निघाली अंबानी.

एकनाथ खडसे
author img

By

Published : Mar 6, 2019, 11:35 PM IST

जळगाव - वक्फ बोर्डाची जमीन हडप केली म्हणून आपण मुकेश अंबानींना नोटीस पाठवली. पण, हे आमच्या लोकांना पटले नाही, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. मुख्यमंत्रीपदाची लालसा बाळगली म्हणून तर आपली ही दशा झाली, अशी खंतही त्यांनी जळगावात बोलताना व्यक्त केली.

जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे 'एक श्याम नाथाभाऊ' के नाम नावाने मुशायरा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, की मुंबईत एका बड्या हस्तीने एक हजार कोटींची वक्फ बोर्डाची अनाथालयासाठी राखीव असलेली जमीन हडप केली. आपण त्याला वक्फ बोर्डाच्या या जमिनीच्या मोबदल्यात एक हजार कोटी रुपये भरण्याची नोटीस दिली होती. ती हस्ती निघाली अंबानी. मात्र, आमच्या काही लोकांना माझी ही भूमिका पटली नाही. असाही गौप्यस्फोट यावेळी खडसेंनी केला.

सरकारमध्ये येणं जाणं चालूच राहतं

चांगले काम केले तर लोक नाव घेतात, नंतर लक्षातही ठेवतात. सरकारमध्ये येणे जाणे चालूच राहते. मंत्री बनणे न बनणे हे चालूच राहते. ४० वर्षांच्या काळात मी अनेकदा मंत्री झालो, असेही खडसे म्हणाले.

undefined

Intro:जळगाव
भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणानंतर आरोप झाल्याने मंत्रीपद गमवावे लागलेले माजीमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मनातील खदखद काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. 'आपण मुख्यमंत्रीपदाची लालसा बाळगून होतो, म्हणून आपली ही दशा झाली' असे धक्कादायक विधान करून खडसे यांनी पुन्हा सरकारला घरचा आहेर दिला आहे.Body:जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे 'एक श्याम नाथाभाऊ' के नाम या मुशायरा तसेच नागरी सत्कार कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी हे विधान केले. ते पुढे म्हणाले की, मुंबईत एका बड्या हस्तीने एक हजार कोटींची वक्फ बोर्डाची अनाथालयासाठी राखीव असलेली जमीन हडप केली. आपण त्याला वक्फ बोर्डाच्या या जमिनीच्या मोबदल्यात एक हजार कोटी रुपये भरण्याची नोटीस दिली होती. ती हस्ती निघाली अंबानी. मात्र, आमच्या काही लोकांना माझी ही भूमिका पटली नाही. असाही गौप्यस्फोट यावेळी खडसेंनी केला.Conclusion:सरकारमध्ये येणं जाणं चालूच राहतं-

चांगलं काम केलं तर लोक नाव घेतात, नंतर लक्षातही ठेवतात. सरकारमध्ये येणं-जाणं चालूच राहतं. मंत्री बनणं न बनणं हे चालूच राहतं. 40 वर्षांच्या काळात मी अनेकदा मंत्री झालो. आताच झालो असे नाही. याआधीही मंत्री होतो, अनेक खात्यांचा मंत्री होतो, असेही खडसेंनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.