ETV Bharat / state

भुसावळमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलवर गुंडांचा धुडगूस - हॉटेलवर गुंडांचा हल्ला

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एका हॉटेलमध्ये अज्ञात गुंडांनी हल्ला केला. या वेळी हॉटेल मालकाला धमकावून गल्ल्यातील रोकड हिसकावून घेत पोबारा केला.

Hooligans attack a hotel on the National Highway in Bhusawal
भुसावळमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलवर गुंडांचा धुडगूस; दहशत निर्माण करून लुटली रोकड
author img

By

Published : Jan 19, 2021, 4:34 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या एका हॉटेलवर अज्ञात गुंडांनी हल्ला करत काही रोकड लुटून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या हॉटेल पंजाब खालसा याठिकाणी ही घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळनंतर या हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे जेवणासाठी ग्राहकांची गर्दी होती. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक काही गुंडांनी हॉटेलवर येऊन धुडगूस घातला. यावेळी गुंडानी हॉटेल मालकाला धमकावून शिवीगाळ केली. हॉटेलच्या वेटरला देखील शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर गुंडांनी हॉटेलमधील साहित्याची नासधूस करत गल्ल्यातून काही रोकड बळजबरीने हिसकावून घेतली.

अचानक घडलेल्या प्रकाराने घबराट -

हॉटेलवर हा प्रकार अचानक घडला. गुंडांनी धुडगूस घालत दहशत निर्माण केल्याने हॉटेल मालक व कर्मचारी घाबरून गेले. गुंडांनी बळजबरीने गल्ल्यातून रोकड काढून घेत पोबारा केला. या प्रकारानंतर हॉटेल मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.