जळगाव - हिंदू धर्म व संस्कृतीची जाणीवपूर्वक टिंगल-टवाळी करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याला पेव फुटले आहे. हा प्रकार कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी आज जळगावात दिला. हिंदू राष्ट्र सेनेच्या उद्दिष्टासंदर्भात माहिती माहिती देण्यासाठी धनंजय देसाई यांनी शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
धनंजय देसाई पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ज्या वेबसिरीज व कार्यक्रम प्रसारित होत आहेत, त्यातून हिंदू देव-देवता तसेच भारतीय संस्कृतीची जाणीवपूर्वक विटंबना केली जात आहे. ज्याप्रमाणे बॉलीवूडच्या माध्यमातून जिहादी मानसिकता व्यक्त होत होती. तीच आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरून व्यक्त होताना दिसत आहे. कित्येक वेबसिरीजच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीची विटंबना सुरु आहे. सध्या 'तांडव' या वेबसिरीजमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. तो खपवून घेतला जाणार नाही, असे प्रकार होत असतील तर त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी हिंदू राष्ट्र सेनेची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - वर्कफ्रॉम होम ट्रेंडचा बांधकाम क्षेत्राला 'असा'ही फायदा
राष्ट्रभक्त नागरिकांनी संघटित होणे गरजेचे
देशद्रोही मानसिकता नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रभक्त नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. राष्ट्रभक्त नागरिकांना संघटित करणे हे हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेदेखील धनंजय देसाई यांनी यावेळी सांगितले.
देशद्रोही आंदोलनांचे पेव उखडून फेकायला हवे
अलीकडच्या काळात आपल्या देशात देशद्रोही आंदोलनांचे पेव फुटले आहे. हे उखडून फेकायला हवे. देशद्रोही शक्ती मग त्या देशातील असो अथवा बाहेरील, त्यांचा उद्देश एकच असतो; तो म्हणजे भारतात अराजक पसरवायचे. त्यासाठी सातत्याने विविध आंदोलनांचे बुरखे घालून या शक्ती देशाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात, असेही धनंजय देसाई यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - वाहतुकीच्या बाबतीत पुण्याचे लोक घाबरतात हेच खूप - अभिनेते विजय पाटकर