ETV Bharat / state

गणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन; ५० वर्षांपासून जळगावात सुरू आहे अनोखी परंपरा - jalgaon collector avinash dhakne

गेल्या ५० वर्षांपासून जळगाव शहरात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणूक निघते. यंदाही मोठ्या उत्साहात ही मिरवणूक निघाली. यावेळी मुस्लीम बांधवांकडून मानाच्या गणपतीचे पूजन झाले. तर हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्रितपणे लालशा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढविली.

गणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन
author img

By

Published : Sep 12, 2019, 7:42 PM IST

जळगाव - समाजातील विभिन्न घटक एकत्र यावेत, या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश काळापासून गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली होती. आजही ती प्रथा जिल्ह्यात कायम आहे. गेल्या ५० वर्षांपासून जळगाव शहरात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणूक निघते. यंदाही मोठ्या उत्साहात ही मिरवणूक निघाली. यावेळी मुस्लीम बांधवांकडून मानाच्या गणपतीचे पूजन झाले. तर हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्रितपणे लालशा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढविली.

गणेश विसर्जन मिरवणुकीचे दृश्ये

हिंदू व मुस्लीम बांधवांना एकत्र आणण्यासाठी नियाज अली यांनी १९७० सालापासून ही परंपरा सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. नियाज अली यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अयाज अली हे या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळतात. जळगाव महापालिकेचा गणपती हा मानाचा गणपती मानला जातो. मिरवणुकीवेळी हा गणपती भिलपुरा चौकात आल्यानंतर त्याठिकाणी नियाज अली फाउंडेशनच्या वतीने मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात येते व गणरायाची पूजा केली जाते. त्यानंतर हिंदू व मुस्लीम बांधव एकत्रितपणे लालशा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवतात.

हेही वाचा- जळगावात ढोल-ताशांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, महापालिका स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे, नियाज अली फाउंडेशनचे अध्यक्ष अयाज अली आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी हिंदू व मुस्लीम बांधवांनी आपल्या भारत देशाची प्रगती होऊ दे, देशात शांतता प्रस्थापित होऊ दे, बळीराजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना विघ्नहर्ता गणरायाकडे केली.

Intro:जळगाव
समाजातील विभिन्न घटक एकत्र यावेत, या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश काळापासून गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. आजही ती कायम आहे. टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सवाचे दर्शन आपल्याला जळगावात घडते. गेल्या ५० वर्षांपासून जळगाव शहरात अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू व मुस्लीम बांधवांच्या ऐक्याचे दर्शन होते. यावेळी मुस्लीम बांधवांकडून मानाच्या गणपतींचे पूजन होते. तर हिंदू व मुस्लीम बांधव एकत्रितपणे लालशा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवतात.Body:हिंदू व मुस्लीम बांधवांना एकत्र आणण्यासाठी नियाज अली यांनी १९७० सालापासून ही परंपरा सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. नियाज अली यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अयाज अली हे या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळतात. जळगाव महापालिकेचा गणपती मानाचा गणपती मानला जातो. मिरवणुकीवेळी हा गणपती भिलपुरा चौकात आल्यानंतर त्याठिकाणी नियाज अली फाउंडेशनच्या वतीने मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत गणरायाची पूजा केली जाते. त्यानंतर हिंदू व मुस्लीम बांधव एकत्रितपणे लालशा बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवतात. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, महापालिका स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे, नियाज अली फाउंडेशनचे अध्यक्ष अयाज अली आदी उपस्थित होते.Conclusion:दरम्यान, यावेळी हिंदू व मुस्लीम बांधवांनी आपल्या भारत देशाची प्रगती होऊ दे, देशात शांतता प्रस्थापित होऊ दे, बळीराजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना विघ्नहर्त्या गणरायाकडे करण्यात आली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.