ETV Bharat / state

जळगावात उष्णतेची लाट; पारा ४५ अंशांवर.. - april

गेल्या आठवडाभरापासून तापमानात ६ ते ७ अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्याने जळगावकरांच्या जिवाची काहिली होत आहे.

जळगावात उष्णतेची लाट
author img

By

Published : Apr 26, 2019, 2:43 PM IST

जळगाव - गेल्या आठवड्यापासून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. सूर्य अक्षरशः आग ओकत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात एप्रिलमध्येच तापमानाचा पारा ४५ अंशांवर पोहचला आहे. या मोसमातील सर्वोच्च तापमान नोंदविण्यात आले आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील तापमान अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगावात उष्णतेची लाट

मध्यंतरी राज्यात अवकाळीचे वातावरण असल्याने तापमानात मोठी घट झाली होती. जळगाव जिल्ह्यातील तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. मात्र, आता पुन्हा तापमानाचा कहर वाढला आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमानात ६ ते ७ अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्याने जळगावकरांच्या जिवाची काहिली होत आहे. सकाळी १० वाजेनंतर उन्हाचा कडाका वाढत असून दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे. सकाळी १० वाजेला ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले जात आहे. दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तापमानाचा सर्वाधिक कहर दिसून येत आहे. एप्रिलमध्येच तापमानाचा पारा ४५ अंशांवर गेल्याने पुढे मे महिन्यात काय परिस्थिती असेल, ही चिंता जळगावकरांना आहे.
वाढत्या उन्हामुळे जळगावकरांना आपली दैनंदिन कामे सकाळीच आटोपून घ्यावी लागत आहेत. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. नोकरदार तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना उन्हाच्या कडाक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून प्रत्येकजण डोक्याला पांढरा रुमाल, डोळ्यांचे रक्षण व्हावे म्हणून सन गॉगल घालूनच घराबाहेर पडत आहे. युवती व महिला देखील अंगात सनकोट, डोक्याला स्कार्फ बांधून उन्हापासून बचाव करत आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे थंड पेयांची मागणी वाढली आहे. शीतपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. कलिंगड, खरबूज यासारख्या शीत फळांना देखील मागणी वाढली आहे.

Intro:Feed send to FTP (17 Visuals) and 2 bytes send to mojo
जळगाव
मागील आठवड्यापासून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. सूर्य अक्षरशः आग ओकत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात एप्रिलमध्येच तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहचला आहे. या मोसमातील सर्वोच्च तापमान नोंदविण्यात आले आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील तापमान अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Body:मध्यंतरी राज्यात अवकाळीचे वातावरण असल्याने तापमानात मोठी घट झाली होती. जळगाव जिल्ह्यातील तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. मात्र, आता पुन्हा तापमानाचा कहर वाढला आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमानात 6 ते 7 अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्याने जळगावकरांच्या जिवाची काहिली होत आहे. सकाळी 10 वाजेनंतर उन्हाचा कडाका वाढत असून दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे. सकाळी 10 वाजेला 40 अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले जात आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तापमानाचा सर्वाधिक कहर दिसून येतोय. एप्रिलमध्येच तापमानाचा पारा 45 अंशांवर गेल्याने पुढे मे महिन्यात काय परिस्थिती असेल, ही चिंता जळगावकरांना आहे.

वाढत्या उन्हामुळे जळगावकरांना आपली दैनंदिन कामे सकाळीच आटोपून घ्यावी लागत आहेत. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच नागरिक घराबाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. नोकरदार तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना उन्हाच्या कडाक्याचा त्रास सहन करावा लागतोय. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून प्रत्येकजण डोक्याला पांढरा रुमाल, डोळ्यांचे रक्षण व्हावे म्हणून सन गॉगल घालूनच घराबाहेर पडत आहे. युवती व महिला देखील अंगात सनकोट, डोक्याला स्कार्फ बांधून उन्हापासून बचाव करत आहेत.Conclusion:दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे लस्सी, ताक, मठठा, लिंबू सरबत, उसाचा रस अशा शीतपेयांना मागणी वाढली आहे. शीतपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. कलिंगड, खरबूज यासारख्या शीत फळांना देखील मागणी वाढली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.