जळगाव - अडावद अन्न व औषध प्रशासन विभागाने अडावद पोलीसांच्या सहकार्याने केजीएन नगरातील एका घरात छापा टाकून तब्बल ६ लाख ७१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घरात टाकला छापा -
गेले काही दिवस या भागात गुटखा विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केजीएन नगरातील एका घरात छापा टाकला. घराची तपासणी केली असता त्याठिकाणी गुटख्याचा मोठा साठा सापडला. जवळपास ६ लाख ७१ हजार एवढ्या किमतीचा हा गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमीन शेख फय्याज (५५) असे या गुन्हा दाखल करण्यात आलेल्यां आरोपीचे नाव आहे.
यांनी केली कारवाई -
अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी सुवर्णा देवीदास महाजन, किशोर साळुंखे यांनी तसेच अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश तांदळे,पोउनि गोकुळसिंग बयास, यादव भदाणे, नसिर तडवी, योगेश गोसावी, संजय तडवी, माधुरी जगताप यांनी हा छापा टाकला. पुढील तपास फौजदार गोकुळसिंग बयास हे करीत आहेत.