ETV Bharat / state

'शेतकरी एका दणक्यात बैलाला सरळ करतो, हे तर सरकार आहे' - gulabrao patil slams Modi

कृषी कायद्यावरून शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तख्तावर शेतकऱ्यांनी तुम्हाला बसवले आहे, तो तख्त शेतकरी बदलून टाकतील. ज्या बुरुजावर तुम्ही आज बसले आहात, तो बुरुज शेतकरी आडवा करतील. शेतकरी एका दणक्यात बैलाला सरळ करू शकतो. हे तर सरकार आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील
author img

By

Published : Dec 6, 2020, 3:21 PM IST

जळगाव - शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, अन्यथा दिल्ली दूर नाही. तुमचे तीनच वर्षे उरले आहेत. ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, तो तख्त शेतकरी बदलून टाकतील, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी दुपारी रेल्वे स्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबराव पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील यांचा केंद्र सरकारवर निशाणा

शेतकरी एका दणक्यात बैलाला सरळ करतो, हे तर सरकार -

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्यासाठी कायदा बनवला, त्या शेतकऱ्यांवर आज अन्याय होत आहे. केंद्र सरकारकडून कायद्याची पायमल्ली होत आहे. शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू आहे. 52 टक्के रोजगार कृषी क्षेत्रातून निर्माण होतो. असे असताना केंद्र सरकार हे शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर अन्याय करत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणे, थांबवले पाहिजे. अन्यथा दिल्ली दूर नाही. तुमची तीन वर्षे उरली आहेत, असे पाटील म्हणाले. तसेच तख्तावर शेतकऱ्यांनी तुम्हाला बसवले आहे, तो तख्त शेतकरी बदलून टाकतील. ज्या बुरुजावर तुम्ही आज बसले आहात, तो बुरुज शेतकरी आडवा करतील. शेतकरी एका दणक्यात बैलाला सरळ करू शकतो. हे तर सरकार आहे, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात मंगळवारी शाळा उघडणार -

जिल्ह्यात मंगळवारी शाळा उघडणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. शाळा उघडण्यास संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात येणार आहे. आगामी काळात कोरोनाची रुग्ण संख्या वाढणार नाही, या अनुषंगाने ही नियमावली असणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने नियमांच्या अधीन राहूनच शाळा सुरू होणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी 1 जागेसाठी डिसले गुरुजींची शिफारस करू : प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.