ETV Bharat / state

'आमचं उष्ट कुणी खाऊ नये', औरंगाबादच्या नामकरणावरुन मनसेवर 'सेनास्त्र' - jalgaon news

औरंगाबाद शहराचे नामकरण 'संभाजीनगर' करण्याची मागणी सर्वप्रथम शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आज प्रत्येक शिवसैनिक संभाजीनगर याच नावाचा पुनरुच्चार करतो. त्यामुळे आमचं उष्ट कुणी खाऊ नये, अशा शब्दांत गुलाबरावांनी मनसेला टोला लगावला आहे.

गुलाबराव पाटील बोलताना...
गुलाबराव पाटील बोलताना...
author img

By

Published : Feb 13, 2020, 8:40 PM IST

जळगाव- औरंगाबाद शहराचे नामकरण 'संभाजीनगर' करण्याचा मुद्दा मनसेने उकरून काढला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याच मुद्द्यावरून गुरुवारी जळगावात मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडले.

गुलाबराव पाटील बोलताना...

हेही वाचा- राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण, राष्ट्रपतींचे गौरवोद्गार

गुलाबराव पाटील गुरुवारी सकाळी जळगावात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना जिल्हास्तरीय मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गुलाबरावांचा मनसेला टोला

औरंगाबाद शहराचे नामकरण 'संभाजीनगर' करण्याची मागणी सर्वप्रथम शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आज प्रत्येक शिवसैनिक संभाजीनगर याच नावाचा पुनरुच्चार करतो. त्यामुळे आमचं उष्ट कुणी खाऊ नये, अशा शब्दांत गुलाबरावांनी मनसेला टोला लगावला आहे.

मनसेने केला शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दा 'हायजॅक'

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत राज्याच्या सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेचे हिंदुत्त्व आता संपुष्टात आले आहे. त्यामुळे राज्यात सत्ता असूनही शिवसेनेला औरंगाबादचे नामकरण 'संभाजीनगर' असे करता आलेले नाही, अशी टीका मनसेच्या वतीने शिवसेनेवर केली जात आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन मनसेने शिवसेनेचा हिंदुत्त्वाचा मुद्दा 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न केल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

सरकार निश्चितच 5 वर्षे चालेल

काही दिवसांपूर्वीच मनसेने आपला झेंडा बदलला. त्यावरुनही चर्चेचे गुऱ्हाळ रंगले होते. आता औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा मनसेने हाती घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसेत घमासान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमचं सरकार 5 वर्षे चालेल-भाजपला आपले आमदार सांभाळायचे आहेत. त्यामुळे ते, आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, लवकरच सत्तेत येऊ, अशी वक्तव्ये करत आहेत. मात्र, आमचं सरकार निश्चितच 5 वर्षे चालेल.

भाजपने सत्तेत येण्याची बोंबाबोंब करू नये

गेली 5 वर्षे त्यांचे सरकार होते. परंतु, त्यांनी जी कामे केली नाहीत ती आम्ही अवघ्या अडीच महिन्यात केली. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी असो की आताच झालेला शासकीय कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा आठवड्याचा निर्णय असो, असे अनेक निर्णय आम्ही घेतले. त्यामुळे भाजपने सत्तेत येण्याची बोंबाबोंब करू नये, असा चिमटा देखील त्यांनी यावेळी भाजपला काढला.

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी समर्थन

दरम्यान, मुंबईत मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होणार असल्याने विरोधकांकडून टीका होत असली तरी गुलाबराव पाटील यांनी मात्र, त्याचे समर्थन केले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक काढले आहे. मंत्र्यांनी तशी मागणी केलेली नव्हती. बंगल्यांचे नूतनीकरण आवश्यक असेल म्हणूनच तसे अंदाजपत्रक काढण्यात आले असेल, अशा शब्दांत पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.