ETV Bharat / state

'त्या' वेळेस आमच्याकडे बघितलेही नाही; गुलाबराव पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना टोला - jalgaon gulabrao patil news

जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी शिवसेनेची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे.

gulabrao patil criticize chandrakant patil in jalgaon
'त्या' वेळेस तर आमच्याकडे पाहिलेच नव्हते; गुलाबराव पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना टोला
author img

By

Published : Dec 4, 2020, 9:42 PM IST

जळगाव - त्यांना आता मित्राची आठवण येत आहे. 'त्या' वेळेस तर आमच्याकडे पाहिलेच नव्हते, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी शिवसेनेची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.

गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील -

मित्राला मित्र म्हणून रहायचे नसेल तर, त्यात दुःख करण्यात काही अर्थ नाही. मात्र, आज मित्र सोबत असता, तर नक्कीच बळ मिळाले असते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर दिली होती. चंद्रकांत यांना टोला लगावताना गुलाबराव पाटील यांनी आता त्यांना मित्राची आठवण येत आहे. 'त्या' वेळेस तर आमच्याकडे पाहिलेच नव्हते, मित्राची आठवण आली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता का असेना त्यांना आमची किंमत कळाली, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मतदारांनी भाजपला किती दूर सोडले, हे लक्षात येते-

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना 'आम्हाला पराभव मान्य असून, आम्ही त्याचे नक्कीच आत्मपरिक्षण करू. मात्र, खरे आत्मपरिक्षण करण्याची गरज मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, या निवडणुकीत शिवसेनेने एकच जागा लढवली होती. ती अल्पशा मतांनी गमावली. त्याठिकाणी भाजपचा नाही तर अपक्ष उमेदवार निवडून आला. शिवसेना आणि अपक्षांची मते एकत्र केली, तर मतदारांनी भाजपला किती दूर सोडले आहे, हे लक्षात येते, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार कोरोना लस - पंतप्रधान मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.