ETV Bharat / state

नारायण राणे पांढऱ्या पायाचे, ते मंत्री झाल्यानेच कोकणावर आपत्ती- गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका - उद्धव ठाकरे लेटेस्ट न्यूज

केंद्रीय मंत्री नारायण राणे या आपत्तीतही राजकारण करत आहेत. नारायण राणे हे पांढऱ्या पायाचे आहेत. ते मंत्री झाल्यामुळेच कोकणावर ही आपत्ती कोसळली आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील
शिवसेना नेते गुलाबराव पाटील
author img

By

Published : Jul 26, 2021, 8:04 PM IST

जळगाव - कोकणासह पश्चिम महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. त्या आपत्तीतून सावरण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, विरोधकांनी यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे या आपत्तीतही राजकारण करत आहेत. नारायण राणे हे पांढऱ्या पायाचे आहेत. ते मंत्री झाल्यामुळेच कोकणावर ही आपत्ती कोसळली आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

नारायण राणे पांढऱ्या पायाचे, ते मंत्री झाल्यानेच कोकणावर आपत्ती- गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका

शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शहरातील लेवा भवन येथे अपंगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंना लक्ष्य करताना त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

आपत्तीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून काम करण्याची गरज -
राज्यात नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. या आपत्तीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. आरोप-प्रत्यारोप व टीका करण्यासाठी नेहमीच राजकीय आखाडा हा रिकामा असतो. मात्र, आपत्तीमध्ये पीडितांना सहकार्य करणे, हेच लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. हे कर्तव्य राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर नेते देखील पार पाडत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या आपत्तीत राजकारण न करता काम करण्याची गरज असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

संकटात असलेला माणूस कोणत्या पक्षाचा आहे माहिती नाही -
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, या नैसर्गिक संकटात असलेला माणूस कोणत्या पक्षाचा आहे माहिती नाही. त्याला माणूस म्हणून मदतीचा हात देण्याची गरज आहे. यासाठी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, या विचाराचा मी आहे. राजकारण करायला भरपूर आखाडे आहेत. त्या आखाड्यात तुम्ही तुमचा झेंडा घेऊन उतरा, आम्ही आमचा झेंडा घेऊन उतरू. मात्र, राज्‍य संकटात असताना राजकारण करणे योग्‍य नसल्‍याचे मत देखील त्‍यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा - राज्यात एक कोटी पूर्ण 'लसवंत', 3.16 कोटी लोकांना मिळाला पहिला डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.