ETV Bharat / state

साखरपुड्यांनतर हुंड्यासाठी मोडले लग्न; नवऱ्या मुलासह ५ जणांवर गुन्हा दाखल - जळगावात हुंड्यासाठी लग्न मोडले

हुंड्यांची मागणी करत लग्न मोडल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वधू पक्षाने याबद्दल तक्रार केली आहे.

Raver police station
रावेर
author img

By

Published : Nov 2, 2020, 4:22 PM IST

रावेर (जळगाव) - साखरपुडा झाल्यानंतर मुलाकडच्या मंडळींनी १० लाख रुपये हुंड्याची मागणी केली. तसेच झालेला साखरपुडा मोडून लग्नास नकार दिला. याप्रकरणी ठाणे येथील वर पक्षाकडील पाच जणांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साखरपुड्याचा खर्च देण्यास नकार

विश्रामजिन्सी येथील चरणसिंग सारीचंद्र पवार यांच्या मुलीचा कल्याण येथील सुदर्शन बालचंद्र चव्हाण यांच्याशी ३ नोव्हेंबर २०१९ रोजी साखरपुडा झाला होता. त्यावेळी लग्नाची तारीख ठरवली होती. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सुदर्शन बालचंद्र चव्हाण, भालचंद्र अमरसिंग चव्हाण, रितेश भालचंद्र चव्हाण, अनिता भालचंद्र चव्हाण (सर्व रा. सुंदर कॉम्प्लेक्स, गौरी पाडा, कल्याण पश्चिम, जिल्हा. ठाणे) व नामोबाई राठोड (रा. मालेगाव रोड, चाळीसगाव) यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क साधून लग्नाची तारीख ठरवण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी १० लाख रुपये हुंडा द्या, तरच आम्ही तुमच्या मुलीशी लग्न करू असे सांगितले. हुंडा मिळणार नाही असे लक्षात आल्याने झालेला साखरपुडा मोडून टाकला. साखरपुड्यात सुदर्शन चव्हाण याला दिलेले २५ ग्रॅम सोने व साखरपुड्याचा २ लाख ५६ हजार रुपये खर्च परत करावा, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी चव्हाण कुटुंबीयांकडे केली. मात्र, सोने व खर्च परत देणार नाही असे म्हणत चव्हाण कुटुंबाने चरणसिंग पवार यांना शिवीगाळ केली. चव्हाण कुटुंबाने फसवणूक केल्याने मुलीचे वडील चरणसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी वर मुलगा सुदर्शन भालचंद्र चव्हाण, वडील भालचंद्र अमरसिंग चव्हाण, भाऊ रितेश भालचंद्र चव्हाण, अनिता बालचंद्र चव्हाण, (सर्व रा. सुंदर कॉम्प्लेक्स, गौरी पाडा, कल्याण पश्चिम, ठाणे) व नामोबाई राठोड (रा. मालेगाव रोड चाळीसगाव) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.