ETV Bharat / state

जळगाव: सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या, आजचे दर - जळगाव सोने दर

गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने सराफ बाजारात उलाढाल संथच आहे. सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वाचा, सविस्तर.

सोने दर न्यूज
सोने दर न्यूज
author img

By

Published : Sep 17, 2021, 4:47 PM IST

जळगाव- आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात सातत्याने चढउतार सुरुच आहे. जळगावातील सराफ बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरात थेट २ हजार रुपयांनी घसरण झाली. चांदी ६२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिरावली. गेल्या ८ महिन्यातील चांदीचे हे सर्वात कमी दर आहेत.

सोन्याच्याही दरात ५५० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. दरम्यान, गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने सराफ बाजारात उलाढाल संथच आहे.

हेही वाचा-गणेशविसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार

२ आठवड्यांपूर्वी चांदीचे दर होते६६ हजारांच्या पुढे-

सध्या सराफ बाजार प्रचंड अस्थिर आहे. मागील २ आठवड्यांपूर्वी जळगाव सराफ बाजारात चांदीचेदर प्रति किलोला ६६ हजारांच्या पुढे होते. मात्र, त्यानंतर मागच्याच आठवड्यात चांदीचे दर १ हजार रुपयांनी घसरले होते. तेव्हा चांदीचे दर ६५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आले होते. तेव्हा चांदी आठवडाभर त्याच दरावर स्थिर राहिली होती. १६ सप्टेंबर रोजी चांदीच्या दरात पुन्हा १ हजाराने घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली होती. ही घसरण होऊन पुन्हा अवघ्या काही तासातच म्हणजे, आज चांदीच्या दरात २ हजार रुपयांची मोठी घसरण झाली. आज जळगावात चांदीचे दर ६२ हजार ५०० रुपये प्रति किलो असे नोंदवले गेले.

हेही वाचा-Anil Deshmukh Case : ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचे नावच नाही

सोन्याची चकाकी फिकी-

चांदीसोबतच सोन्याच्याही दरात शुक्रवारी घसरण झाली. ४७ हजार ८५० रुपये प्रति तोळ्यावर असलेल्या सोन्याच्या दरात शुक्रवारी ५५० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. या पूर्वी ११ ऑगस्ट रोजी सोने ४७ हजार ४०० रुपयांवर होते. त्यानंतर मात्र, ते वाढत गेले होते. आता पुन्हा त्यात घसरण झाली.

हेही वाचा-संजय राऊत यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार - चंद्रकांत पाटील

सणासुदीला उलाढाल वाढीची अपेक्षा-

सराफ बाजारात सध्या मंदीचे सावट आहे. येणाऱ्या काळात नवरात्रोत्सव, दसरा त्यानंतर दिवाळी असे सण लागोपाठ येत आहेत. सणासुदीच्या या काळात सराफ बाजारातील उलाढाल वाढीची अपेक्षा सराफ व्यवसायिकांना आहे. या महिन्याच्या अखेरीस गुरुपुष्यामृत योग येत आहे. या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते. गुरुपुष्यामृत योग साधून सोने खरेदीला ग्राहक दाखल होतील, असा अंदाज सराफ व्यवसायिक व्यक्त करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.