ETV Bharat / state

आयात शुल्कात वाढ झाल्याने सोने चकाकले; जळगावात सोने 34 हजार 750 रुपये प्रतितोळा - अर्थसंकल्पात

जळगावात शुक्रवारी सकाळी सराफ बाजार सुरू झाला तेव्हा सोन्याचे दर 34 हजार 200 रुपये प्रतितोळा होते. मात्र, अर्थसंकल्प सादर होताच सोन्याचे दर दुपारी साडेपाचशे रुपयांनी वाढून 34 हजार 750 रुपये प्रतितोळा एवढे झाले.

सराफ बाजार
author img

By

Published : Jul 5, 2019, 7:32 PM IST

जळगाव - मोदी 2 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात सोन्यासह मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव मांडल्याने सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. अर्थसंकल्प सादर होताच जळगावात सोन्याचे दर साडेपाचशे रुपयांनी वाढले. एका दिवसात सोन्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सराफ बाजार

जळगावात शुक्रवारी सकाळी सराफ बाजार सुरू झाला तेव्हा सोन्याचे दर 34 हजार 200 रुपये प्रतितोळा होते. मात्र, अर्थसंकल्प सादर होताच सोन्याचे दर दुपारी साडेपाचशे रुपयांनी वाढून 34 हजार 750 रुपये प्रतितोळा एवढे झाले. वित्तीय तूट वाढत असताना सोने आयातीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण होतो. त्यामुळे सोन्यासह मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आला. हे आयात शुल्क सध्या 10 टक्के असताना ते अडीच टक्क्यांनी वाढून साडेबारा टक्के करण्याचा प्रस्ताव मांडल्यामुळे सोने महागले आहे.

सोन्याचे दर वाढतच असल्याने सराफ बाजारावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्राहकांचे सोने खरेदीचे बजेट कोलमडले आहे. लग्नसराईनंतर सोन्याचे दर एक तर कमी होतात किंवा स्थिर राहतात. असा आजवरचा अनुभव आहे. पण यावर्षी सराफ बाजारात निराळेच चित्र आहे. अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याचे दर वाढतच आहेत. शुक्रवारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जळगावात लगेचच सोन्याचे दर तब्बल साडेपाचशे रुपयांनी वाढल्याने ग्राहकांमध्ये नाराजी दिसून आली.

अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने आता पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरवाढीवर होत आहे. अजून काही दिवस हीच स्थिती कायम राहणार असल्याने सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.

Intro:जळगाव
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत सादर केलेल्या चालू पंचवार्षिकीच्या पहिल्या अर्थसंकल्पात सोन्यासह मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव मांडल्याने जळगावात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. अर्थसंकल्प सादर होताच जळगावात सोन्याचे दर साडेपाचशे रुपयांनी वाढले. एका दिवसात सोन्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Body:जळगाव शुक्रवारी सकाळी सराफ बाजार सुरू झाला तेव्हा सोन्याचे दर 34 हजार 200 रुपये प्रतितोळा होते. मात्र, अर्थसंकल्प सादर होताच सोन्याचे दर दुपारी साडेपाचशे रुपयांनी वाढून 34 हजार 750 रुपये प्रतितोळा एवढे झाले. वित्तीय तूट वाढत असताना सोने आयातीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण होतो. त्यामुळे सोन्यासह मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आला. हे आयात शुल्क सध्या 10 टक्के असताना ते अडीच टक्क्यांनी वाढून साडेबारा टक्के करण्याचा प्रस्ताव मांडल्यामुळे सोने महागले आहे.

सोन्याचे दर वाढतच असल्याने सराफ बाजारावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्राहकांचे सोने खरेदीचे बजेट कोलमडले आहे. लग्नसराईनंतर सोन्याचे दर एक तर कमी होतात किंवा स्थिर राहतात. असा आजवरचा अनुभव आहे. पण यावर्षी सराफ बाजारात निराळेच चित्र आहे. अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याचे दर वाढतच आहेत. शुक्रवारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जळगावात लगेचच सोन्याचे दर तब्बल साडेपाचशे रुपयांनी वाढल्याने ग्राहकांमध्ये नाराजी दिसून आली.

Conclusion:अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने आता पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरवाढीवर होत आहे. अजून काही दिवस हीच स्थिती कायम राहणार असल्याने सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.