ETV Bharat / state

गिरणा नदीला अनेक वर्षांनंतर पूर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यामुळे पुन्हा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी दिली आहे. गिरणा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे.

गिरणा नदीला अनेक वर्षांनंतर पूर
गिरणा नदीला अनेक वर्षांनंतर पूर
author img

By

Published : Sep 20, 2020, 3:26 PM IST

जळगाव - गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गिरणा धरणात वरील बाजूने पाण्याची मोठी आवक सुरू आहे. खबरदारी म्हणून धरणातून गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आला आहे. म्हणून अनेक वर्षांनंतर गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठालगत असलेल्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गिरणा नदीला अनेक वर्षांनंतर पूर

मुसळधार पावसामुळे सध्या गिरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याची आवक वाढल्याने गिरणा धरणातून आज(रविवार) सकाळी ८.४० वाजता पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. काल रात्री मुसळधार पाऊस पडल्याने गिरणा धरणाचा प्रवाह ६६ हजार ८५३.६२ क्युसेकवरून ७४ हजार २८२ क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला. त्याचप्रमाणे मन्याड धरणातून ७ हजार ५०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडण्यात आला आहे. सद्यस्थितीत गिरणा आणि मन्याड धरणातून एकत्रितपणे तब्बल ८१ हजार ७८२ क्युसेकने गिरणा नदीपात्रात पाणी सुरू असल्याने नदीला पूर आला आहे.

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यामुळे पुन्हा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी दिली आहे. गिरणा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, असेही आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - जळगाव शहरात गावठी पिस्तूलसह धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यास अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.