जळगाव - आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्वाने सर्वांना परिचित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी आपल्या जामनेर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चांगलाच ठेका धरला. ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन नृत्य तर केलेच, शिवाय लेझीमही हाती घेऊन नृत्याचा फेर धरला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील भीम नगरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग नोंदवून भीम अनुयायांचा उत्साह वाढवला. लेझीमच्या तालावर त्यांनी नृत्याचा फेर धरला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांसोबत त्यांनी स्वतः सेल्फीदेखील काढले. यावेळी मिरवणुकीत ट्रॅक्टर चालविण्याचा मोहदेखील त्यांना आवरता आला नाही. भीम अनुयायांना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.