ETV Bharat / state

शासन आदेशामुळे जळगावातील १०० कोटींच्या कामांना ब्रेक; भाजपच्या अडचणीत भर - MLA suresh bhole comments

राज्य सरकारने या आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध योजनांतर्गत निधी मंजूर केला होता. परंतु, संबंधित निधीतून होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामांना उद्धव ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर होताच भाजपची मुस्काटदाबी सुरू झाल्याचे चित्र आहे.

girish mahajan and  MLA suresh bhole commented on mahavikas aghadi' s policy
शासन आदेशामुळे जळगावातील १०० कोटींच्या कामांना ब्रेक
author img

By

Published : Dec 9, 2019, 7:39 PM IST

जळगाव - राज्यात सत्तांतर होताच भाजपची मुस्काटदाबी सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने या आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध योजनांतर्गत निधी मंजूर केला होता. परंतु, संबंधित निधीतून होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामांना उद्धव ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे.

निधी मिळाल्यानंतरही ज्या कामांना कार्यादेश मिळालेले नाहीत; अशा कामांना ब्रेक लागल्याने भाजपचे संख्याबळ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था डावलल्या जात असल्याचे चित्र आहे.

शासन आदेशामुळे जळगावातील १०० कोटींच्या कामांना ब्रेक

जळगाव महापालिकेकडून शंभर कोटींची विविध कामे प्रस्तावित होती. मात्र, नव्या सरकारने दिलेल्या दणक्यामुळे आता ही कामे थांबली आहेत.

सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या विकासकामांचे कार्यादेश देण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावी, असे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. तसेच जी कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशा कामांची यादी देथील शासनाकडे पाठवण्याचे सांगण्यात आले आहे. सरकारच्या या आदेशामुळे भाजप शासित स्थानिक स्वराज्य संस्थांची गोची झाली आहे.

सध्या जळगाव महापालिकेत 57 नगरसेवकांच्या बळावर भाजपचे निर्विवाद बहुमत आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले होते. यानंतर शहराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात शंभर कोटींचा निधी मंजूर झाला.

या निधीतून 34 कोटींच्या कामांच्या निविदा देखील काढण्यात आल्या. मात्र, आता शासनाने या कामांना स्थगिती दिली आहे. विकासकामे थांबल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

जळगाव शहरात अमृत योजनेतून नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुरू आहे. या कामामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे महापालिका प्रशासनावर नागरिक नाराज आहेत. भुयारी गटार योजनेचेही काम प्रस्तावित असल्याने रस्ते दुरुस्ती थांबवण्यात आली आहे. आता शासनाच्या आदेशामुळे गटारे, नाल्यांवरील संरक्षक भिंती, कॉलन्यांतर्गत रस्ते दुरुस्तीची कामे देखील थांबली आहेत.

राज्यात सत्तांतर होताच भाजपला लक्ष्य करण्याचे काम उद्धव ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे विकासाला खिळ बसण्याची भीती आहे. किमान पायाभूत सुविधांची कामे थांबवायला नकोत, तसेच स्थगिती दिलेली कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

Intro:जळगाव
राज्यात सत्तांतर होताच भाजपची मुस्कटदाबी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध योजनांतर्गत दिलेल्या निधीतून होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामांना उद्धव ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. निधी मिळाल्यानंतर ज्या कामांना कार्यादेश मिळालेले नाहीत, अशा कामांना ब्रेक लागल्याने भाजप शासित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांवर डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे. जळगाव महापालिकेकडून १०० कोटी रुपयांची विविध पायाभूत सुविधांची कामे प्रस्तावित होती. मात्र, नव्या सरकारने दिलेल्या दणक्यामुळे ही कामे थांबली आहेत.Body:सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी विविध योजनांतर्गत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पायाभूत सुविधांसाठी वितरित केलेल्या निधीपैकी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत, अशा सर्व कामांना कार्यादेश देण्याची कार्यवाही राज्य शासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावी. तसेच ज्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत, अशा कामांची यादी शासनाकडे पाठवावी, असे आदेश नव्या सरकारने काढले आहेत. सरकारच्या या आदेशामुळे भाजप शासित स्थानिक स्वराज्य संस्थांची गोची झाली आहे. जळगाव महापालिकेत ५७ नगरसेवकांच्या बळावर भाजपचे निर्विवाद बहुमत आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले होते. एकहाती सत्ता आली तर शहराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे त्यांनी आश्वासित केले होते. महापालिकेत एकहाती सत्ता आल्याने नंतरच्या काळात जळगाव शहरातील पायाभूत सुविधांच्या कामासाठी १०० कोटी रुपये मंजूर देखील झाले होते. या निधीतून शहरात विविध ठिकाणी गटारी, नाल्यांवर संरक्षक भिंती, मोकळ्या जागांचा विकास, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, काही रस्ते अशा प्रकारची कामे केली जाणार होती. १०० कोटी रुपयांच्या निधीतून ३४ कोटींच्या कामांच्या निविदा देखील काढण्यात आल्या. मात्र, आता शासनाने या कामांना स्थगिती दिली आहे. विकासकामे थांबल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

जळगाव शहरात अमृत योजनेतून नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुरू आहे. या कामामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे महापालिका प्रशासनावर नागरिकांचा प्रचंड रोष आहे. पुढे भुयारी गटार योजनेचेही काम प्रस्तावित असल्याने रस्ते दुरुस्ती थांबविण्यात आली आहे. आता शासनाच्या आदेशामुळे गटारी, नाल्यांवरील संरक्षक भिंती, कॉलन्यांतर्गत रस्ते दुरुस्तीचीही कामे थांबली आहेत. त्यामुळे नागरिकांचा भाजप विरोधात रोष वाढू लागला आहे. आता शासनाकडून या कामावरील स्थगिती केव्हा उठवली जाते, याची प्रतीक्षा आहे.Conclusion:ठाकरे सरकारवर आरोप-

राज्यात सत्तांतर होताच भाजपला लक्ष्य करण्याचे काम उद्धव ठाकरे सरकारकडून सुरू असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे विकासाला खिळ बसण्याची भीती आहे. हा प्रकार चुकीचा आहे. किमान पायाभूत सुविधांची कामे थांबवायला नकोत, स्थगिती दिलेली कामे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

बाईट : 1) गिरीश महाजन, भाजप नेते  2) सुरेश भोळे, भाजप आमदार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.