ETV Bharat / state

जळगाव : भूमिगत गटारींचे काम त्वरित पूर्ण करा; उपमहापौर सुनील खडके यांच्या प्रशासनाला सूचना - जळगाव उपमहापौर सुनील खडके

इच्छादेवी चौफुली ते मेहरूण तलावपर्यंतचा हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्याच्या डागडुजीसाठी भूमिगत गटारींचे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

jalgaon
भूमिगत गटारींचे काम त्वरित पूर्ण करा; उपमहापौर सुनील खडके यांच्या प्रशासनाला सूचना
author img

By

Published : Dec 11, 2020, 6:14 PM IST

जळगाव - शहरातील इच्छादेवी चौक ते डी मार्टपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या परिसरात भूमिगत गटारींचे काम झाले नसल्याने रस्त्याची दुरुस्ती रखडली आहे. इच्छादेवी चौफुली ते मेहरूण तलावपर्यंतचा हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्याच्या डागडुजीसाठी भूमिगत गटारींचे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. दरम्यान, या मुख्य रस्त्यावरील विद्युत वाहिनी देखील २० दिवसांच्या आत स्थलांतरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

भूमिगत गटारींचे काम त्वरित पूर्ण करा; उपमहापौर सुनील खडके यांच्या प्रशासनाला सूचना

'उपमहापौर आपल्या दारी' उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी शहरातील प्रभाग १४ ला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक सदाशिव ढेकळे, सुरेखा सोनवणे, सुनील पाटील, माजी स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, मीनाक्षी पाटील, आशुतोष पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, भूषण लाडवंजारी, उमेश सोनवणे आदींसह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

इंद्रप्रस्थ भवनजवळ प्रसाधनगृह उभारावे-

रामेश्वर कॉलनीतील इंद्रप्रस्थ भवनाजवळ मोकळी जागा असून, त्याठिकाणी प्रसाधनगृह उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या. रामेश्वर कॉलनीत नाल्याचे बांधकाम रखडले असल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून डास, मच्छरांचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौरांनी याबाबत तात्काळ ठेकेदाराशी बोलणे करून काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. रुपसदन रिक्षा स्टॉपजवळ नाल्याला कठडा नसल्याने अपघाताची शक्यता असल्याचा मुद्दाही उपमहापौरांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत योग्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

रस्त्याच्या चाऱ्या योग्य पद्धतीने बुजवा-

रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरात अनेक ठिकाणी खोदलेल्या अमृत योजनेच्या चाऱ्या योग्य पद्धतीने बुजविण्यात आलेल्या नाहीत. त्या योग्य पद्धतीने बुजवण्याच्या सूचनाही उपमहापौरांनी केल्या. आदित्य चौक ते डी-मार्ट रस्त्याची दुरवस्था झाली असून परिसरात अनेक ठिकाणी एलईडी नसल्याची समस्याही नागरिकांनी यावेळी मांडली.

हेही वाचा -पिंपरीतील सामाजिक सुरक्षा पथकाची 'तुफान'कामगिरी; अडीच महिन्यात दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.