ETV Bharat / state

जळगावात वरुणराजाची कृपा व्हावी म्हणून काढली जिवंत माणसाची प्रेतयात्रा; नेमका काय आहे प्रकार, पाहा... - जळगावात जिवंत माणसाची प्रेतयात्रा

वरुणराजाची कृपा व्हावी म्हणून गांधली गावात जिवंत माणसाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. ग्रामीण भागात पूर्वापार ही प्रथा चालत आली आहे.

jalgaon
जिवंत माणसाची प्रेतयात्रा
author img

By

Published : Jul 31, 2021, 5:05 AM IST

Updated : Jul 31, 2021, 5:18 AM IST

जळगाव - राज्यात अनेक ठिकाणी मान्सून धो-धो बरसत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गांधली परिसरात मात्र, अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. जुलै महिना उलटला तरी देखील पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार पेरणीचे पीकही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत वरुणराजाची कृपा व्हावी म्हणून गांधली गावात जिवंत माणसाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. ग्रामीण भागात पूर्वापार ही प्रथा चालत आली आहे. अशी प्रेतयात्रा काढल्याने वरुणराजा प्रसन्न होतो, मुसळधार पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची धारणा आहे.

वरुणराजाची कृपा व्हावी म्हणून काढली जिवंत माणसाची प्रेतयात्रा

अमळनेर तालुक्यातील गांधली गावाच्या परिसरात यावर्षी अजूनही चांगला पाऊस पडलेला नाही. पावसाअभावी पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. तिबार पेरणीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरीराजा आता वरुणराजाला धावा घालत आहे. अशातच ग्रामीण भागात प्रचलित असलेल्या आख्यायिकेनुसार गांधलीकरांनी एका जिवंत माणसाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

वरुणराजा बसर रे बाबा...

वरुणराजाची कृपा व्हावी म्हणून जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढण्यात आली. जिवंत माणसाला तिरडीवर झोपवून ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. गावातील भिकन पाटील नामक व्यक्ती तिरडीवर झोपला. गावातील काही युवक खांदेकरी झाले. ग्रामीण बोलीभाषेतील 'आग्या'ची भूमिका शशिकांत पाटील याने पार पाडली. आता वरुणराजाने कृपा केली नाही तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्यावाचून पर्याय उरणार नाही, अशी उपहासात्मक चर्चा गावात सुरू होती.

ग्रामस्थांचा दुसरा मतप्रवाह असा-

या प्रकारावेळी काही ग्रामस्थांनी दुसरा मतप्रवाह व्यक्त केला. पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे. श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड घालणे गरजेचे आहे. अशा प्रकारे काहीतरी करून पाऊस येईल, ही अपेक्षा करण्यापेक्षा पर्यावरण संवर्धनावर लक्ष दिले, वृक्षलागवड केली तर नक्कीच पाऊस येईल, असे मत गावातील सुज्ञ मंडळी मांडत होती.

Last Updated : Jul 31, 2021, 5:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.