ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधची अर्धशतकी परंपरा! मोहाडीकरांनी घालून दिला आदर्श - Mohadi Gram Panchayat unopposed

जिल्ह्यातील एक गाव असे आहे जेथे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एकमेकांमधील हेवेदावे दूर ठेवत निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्यात आला आहे. मोहाडी (ता. जळगाव) असे या गावचे नाव आहे. गावाला बिनविरोध निवडणुकीची अर्धशतकी परंपरा लाभली आहे.

Gram Panchayat Election Jalgaon
ग्रामपंचायत मोहाडी
author img

By

Published : Jan 9, 2021, 4:06 PM IST

जळगाव - ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, गावकी-भाऊकीतील वर्चस्वाची लढाई. मग त्यात वादविवाद, हेवेदावे आलेच. यामुळे कधीकधी सामाजिक एकोप्याला गालबोट लागून हिंसा घडते. परंतु, जिल्ह्यातील एक गाव असे आहे जेथे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एकमेकांमधील हेवेदावे दूर ठेवत निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्यात आला आहे. मोहाडी (ता. जळगाव) असे या गावचे नाव आहे. गावाला बिनविरोध निवडणुकीची अर्धशतकी परंपरा लाभली आहे.

माहिती देताना जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे व ग्रामस्थ

हेही वाचा - जळगाव: ग्रामंपचायतीच्या ५,१५४ जागांसाठी १३, ८४७ उमेदवार रिंगणात

जळगाव शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर मोहाडी हे गाव वसलेले आहे. गावाची लोकसंख्या साधारणपणे पाच ते साडेपाच हजारच्या घरात आहे. या गावाची ग्रामपंचायत निवडणूक पूर्वीपासून बिनविरोध पार पडत आहे. आताही ग्रामस्थांनी सर्वानुमते निवडणूक बिनविरोध केली. 11 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, आता सर्वानुमते शासनाच्या निर्देशानुसार जाणकार व्यक्तीची सरपंचपदी निवड केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधची अर्धशतकी परंपरा लाभलेल्या मोहाडीकरांनी इतर गावांसमोर एक अनोखा आदर्श घालून दिला आहे.

भिलाभाऊ सोनवणे यांची प्रेरणा -

जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत भिलाभाऊ सोनवणे हे याच गावचे रहिवासी होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 1959 मध्ये बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते. त्यानंतर ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. या परंपरेला आता अर्धशतक पूर्ण झाले असून, त्यात खंड पडलेला नाही, हे विशेष.

गावात कोळी, वंजारी, गवळी, भिल्ल समाजबांधव वास्तव्याला आहेत. सोनवणे यांनी गावातील प्रत्येक समाजाला सोबत घेऊन त्यांना ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्वाची संधी दिली. त्यांचा हाच वारसा त्यांच्यानंतर पूत्र पवन सोनवणे, भाऊ प्रभाकर सोनवणे पुढे चालवत आहेत.

ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल -

मोहाडी हे गाव ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल आहे. गावात पाणीपुरवठा, स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावात पक्के रस्ते, ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीची करवसुली 100 टक्के आहे. गावासाठी विशेष पाणीपुरवठा योजनेतून 2 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीतून पाण्याची टाकी मंजूर झाली असून, तिचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

गावातला वाद मिटतो गावातच -

मोहाडी हे गाव शांतताप्रिय गाव आहे. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत गावात काही वाद उद्भवला तर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीने तो गावातच मिटवला जातो. आजपर्यंत गावातील एकही वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेला नाही, हे विशेष.

हेही वाचा - जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सट्टा; तीन जणांवर गु्न्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.