ETV Bharat / state

जळगावात लघु उद्योगाच्या नावाखाली फसवणूक; दाम्पत्याला अटक - जळगावात महिलांची फसवणूक

याप्रकरणी वत्सला रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. यात या पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. तर, जागृती निरज जोशी ही मात्र अद्यापही फरार आहे.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Feb 28, 2021, 5:04 PM IST

जळगाव - लघुउद्योग सुरू करण्याच्या नावाखाली लोकांची साडे तेरा लाख रूपयांची फसवणूक करणार्‍या संगीता निरज जोशी व निरज मदनलाल जोशी या दाम्पत्याला रामानंदनगर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, संगीता निरज जोशी (वय ४७) व निरज मदनलाल जोशी (वय ४८, दोघे रा. रा. गुजर खर्दे, ता. शिरपूर) यांनी नातेवाईकांच्या मदतीने ५ जूलै २०१९ ते १ फेब्रुवारी २०२० या कालावधीत लोकांना लघुउद्योग स्थापन करण्याचे आमीष दाखवले. त्यासाठी विविध बचत गटांची स्थापन करुन लोकांकडून पैसे उकळले. यानंतर मात्र पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

जागृती निरज जोशी फरार-

याप्रकरणी वत्सला रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. यात या पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. तर, जागृती निरज जोशी ही मात्र अद्यापही फरार आहे. या दाम्पत्यास न्यायाधीश जी. जी. कांबळे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोघांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले. यातील जागृती निरज जोशी ही फरार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.