ETV Bharat / state

जळगाव : दालमिल व्यापाऱ्याची 19 लाखांत फसवणूक; सुरतच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल - fraud with dalmil trader jalgaon

एमआयडीसी सेक्टरमध्ये रमेशचंद तेजराज जाजु यांची आर.सी.फुड इंडीया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. जाजु हे व्यापारी असल्यामुळे त्यांचे जिल्हा व राज्याबाहेर हरबरा दाळ आणि तुरदाळ विक्री करतात. खरेदी विक्रीचा व्यवहार हे ऑनलाइन होत असतात.

midc police station, jalgaon
एमआयडीसी पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 21, 2021, 7:43 PM IST

जळगाव - शहरातील दालमिल व्यापाऱ्याची सुरत येथील एका दुकानदाराने 19 लाख 78 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. रमेशचंद तेजराज जाजु (वय-63, रा. गणपती नगर) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -

एमआयडीसी सेक्टरमध्ये रमेशचंद तेजराज जाजु यांची आर.सी.फुड इंडीया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. जाजु हे व्यापारी असल्यामुळे त्यांचे जिल्हा व राज्याबाहेर हरबरा दाळ आणि तुरदाळ विक्री करतात. खरेदी विक्रीचा व्यवहार हे ऑनलाइन होत असतात. सुरत येथील मुकेश देवशीभाई कथारोटीया (रा. वराछा बँकेच्या पुढे, सुदामा चौक, सुरत) यांचे ट्रेडींग दुकान आहे. त्यांच्याशी तुर व हरबरा दाळ व्यापाराकरिता ऑनलाइन व्यवहार 27 डिसेंबर 2020 झाला. त्यानंतर वेळोवेळी व्यवहार करून ठरलेली रक्कम पाठवित होते. रमेशचंद तेजराज जाजु यांनी 19 लाख 78 हजार 540 रुपयांचा चना व तुरदाळ त्यांना पाठविली. मात्र, मुकेश कथारोटीया यांनी पैसे पाठविले नाही.

हेही वाचा - कोरोना नियमांचा भंग केल्याने जळगावात मंगल कार्यालयांना ठोकले टाळे

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रमेशचंद जाजु यांनी एमआयडीसी पोलिसांत धाव घेऊन मुकेश कथारोटीया यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. याप्रकरणी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.