ETV Bharat / state

धक्कादायक; जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Aug 22, 2020, 3:06 PM IST

चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तसेच पाचोरा-भडगावचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने ते घरीच 'सेल्फ क्वारंटाईन' झाले आहेत.

jalgaon
आमदार किशोर पाटील

जळगाव - जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तसेच पाचोरा-भडगावचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने ते घरीच 'सेल्फ क्वारंटाईन' झाले आहेत. याबाबत त्यांनीच सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण युवा आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते चाळीसगाव मतदार संघातून विजयी झाले आहेत. आमदार चव्हाण यांनी कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने आपली कोरोना तपासणी करून घेतली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आपल्या घरीच क्वारंटाईन झाले आहेत. दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांचा उद्या (२३ ऑगस्ट) रोजी वाढदिवस आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आमदार किशोर पाटील देखील बाधित

दुसरीकडे, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्यात त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आमदार किशोर पाटील यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आपल्या घरीच क्वारंटाईन झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.