ETV Bharat / state

स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघातच ४० जणांना दुषित पाण्याची बाधा ! - सतखेडे गावातील 40 जणांना बाधा

धरणगाव तालुक्यातील सतखेडे गावात दुषित पाण्यामुळे ४० ग्रामस्थांना बाधा झाली आहे. ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडला आहे.

Gulabrao Patil
गुलाबराव पाटील
author img

By

Published : Jul 1, 2020, 10:46 AM IST

जळगाव- राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या धरणगाव तालुक्यात दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. धरणगाव तालुक्यातील सतखेडे गावात दुषित पाण्यामुळे ४० ग्रामस्थांना बाधा झाली आहे. अस्वस्थ ग्रामस्थांवर जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत ग्रामसेवक नामदेव दगडू शिंपी यांना निलंबित करण्यात आले आहे.

राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा धरणगाव तालुका हा मूळ मतदारसंघ आहे. याच तालुक्यातील ते रहिवासी देखील आहेत. धरणगाव तालुक्यातील सतखेडे येथे दुषित पाणीपुरवठा झाल्याने गावातील ४० ग्रामस्थांना जुलाब, मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास होऊ लागला. अनेक जण अस्वस्थ झाले होते. या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा तसेच आरोग्य विभागाने तातडीने दखल घेत उपाययोजना सुरू केल्या. त्रास होणाऱ्या सर्व ग्रामस्थांवर तत्काळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार सुरू करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील गावात येऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि. रा. लोखंडे, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब बाभळे, तालुक्याच्या गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे, उपअभियंता रमेश वानखेडे, जलनिरीक्षक दीपक राजपूत, पाणी गुणवत्ता सल्लागार धीरज भदाणे यांनी गावात पाहणी केली. पाईपलाईनची गळती दुरुस्ती करणे, पाणी शुद्धिकरणासाठी टी. सी. एल. पावडरचा पुरेसा वापर करण्याबाबत सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी यांना सूचना केल्या आहेत. दरम्यान, गावातील परिस्थिती नियंत्रणात असून, दुषित पाण्यामुळे बाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.