ETV Bharat / state

जळगावात विनापरवाना दारूची वाहतूक; मुद्देमालासह कारचालकास अटक - liquor seized in Jalgaon

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली असता, कार क्रमांक एमएच ०२ जेपी ००७१ मधील कार चालक संशयास्पदरित्या हालचाली करत असताना दिसून आला. वाहनाची तपासणी केल्यानंतर वाहनाच्या डिक्कीमध्ये १२ हजार ४८० रूपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली.

Jalgaon liquor seized
जळगावात विनापरवाना दारूची वाहतूक; मुद्देमालासह कारचालकास अटक
author img

By

Published : Oct 14, 2020, 9:18 PM IST

जळगाव - विनापरवाना देशी-विदेशी दारूची कारमधून वाहतूक करणाऱ्या कारचालकाला मुद्देमालासह एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील मुद्देमाल आणि चारचाकी हस्तगत करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील हॉटेल कस्तुरीजवळ कारमधून बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली असता, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कार क्रमांक एमएच ०२ जेपी ००७१ मधील कार चालक संशयास्पदरित्या हालचाली करत असताना दिसून आला. वाहनाची तपासणी केल्यानंतर वाहनाच्या डिक्कीमध्ये १२ हजार ४८० रूपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली.

याप्रकरणी कारचालक राजेंद्र पुंडलिक चांदेकर (वय-५६, रा. सुतार गल्ली, तोंडापूर ता. जामनेर) याला अटक करण्यात आली असून, कारसह देशी-विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विजय बावस्कर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.