ETV Bharat / state

जळगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण - जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण न्यूज

जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साधेपणाने साजरा झाला. कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते.

जळगाव प्रजासत्ताक दिन न्यूज
जळगाव प्रजासत्ताक दिन न्यूज
author img

By

Published : Jan 26, 2021, 12:21 PM IST

जळगाव - जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साधेपणाने साजरा झाला. कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते.

जळगाव प्रजासत्ताक दिन न्यूज
जळगाव : प्रजासत्ताक दिन
जळगाव प्रजासत्ताक दिन न्यूज
जळगाव : प्रजासत्ताक दिन
जळगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

हेही वाचा - प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायाच्या मंदिरात 'तिरंगी' सजावट

सकाळी 9.15 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी सोहळ्याला उपस्थित नागरिक तसेच शासकीय अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा प्रदान केल्या. या सोहळ्याला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते.

नागरिकांनी कोरोनाची खबरदारी घ्यावी

या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जगभरात कोरोना महामारीच्या संकटाने हाहाकार माजवला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील काळात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होता. परंतु, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यात यश आले. आता कोरोनाची लस आली असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ती दिली जात आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

हेही वाचा - दांडी बीच येथील समुद्रात 400 फुट लांब तिरंग्याची निर्मिती; देशाला अनोखी सलामी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.