ETV Bharat / state

जळगावात कोरोना लसीकरणाचे पहिले खासगी केंद्र सुरू; आतापर्यंत 3 हजार जणांना मिळाली लस - jalgaon vaccination news

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे पहिले खासगी केंद्र सुरू झाले आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या डॉ. राजेश पाटील यांच्या विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाचे केंद्र सुरू झाले आहे.

vaccination center
कोरोना लसीकरणाचे पहिले खासगी केंद्र
author img

By

Published : May 28, 2021, 3:51 PM IST

Updated : May 28, 2021, 4:37 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे पहिले खासगी केंद्र सुरू झाले आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या डॉ. राजेश पाटील यांच्या विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये हे केंद्र सुरू असून, नागरिकांना सशुल्क लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी दररोज 500 ते 600 नागरिकांना कोवॅक्सिनची लस दिली जात आहे. गेल्या आठवडाभरात या केंद्रावर 3 हजारांहून अधिक नागरिकांना लसीकरण झाले आहे.

जळगावात कोरोना लसीकरणाचे पहिले खासगी केंद्र सुरू

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा टक्का वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य सरकारकडून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि लसीची पुरेशी उपलब्धता होत नसल्यामुळे लसीकरणाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. अशा परिस्थितीत आता खासगी रुग्णालयांमधून नागरिकांना कोरोनाची लस मिळण्यास सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगावात डॉ. राजेश पाटील यांच्या विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाचे खासगी केंद्र आठवडाभरापूर्वी सुरू झाले आहे. डॉ. पाटील यांनी कोवॅक्सिनची लस उपलब्ध केली असून, जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक परवानगी घेऊन सशुल्क लसीकरणाला प्रारंभ केला आहे.

जिल्ह्यात 32 शासकीय लसीकरण केंद्र-

जळगाव जिल्ह्यात सध्या लसींचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने खासगी केंद्रांवरील लसीकरण थांबवण्यात आले आहे. केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, महापालिका व नगरपालिका रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. लसींची उपलब्धता ज्याप्रमाणे होत आहे, तसे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 85 हजार 997 जणांना पहिला तर 1 लाख 15 हजार 533 जणांना कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात 32 शासकीय लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त डॉ. राजेश पाटील यांच्या विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये असलेल्या खासगी केंद्रावर लसीकरण होत आहे. याठिकाणी नागरिकांना 1300 रुपयात कोवॅक्सिनची लस मिळत आहे.

हेही वाचा - सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक

नागरिकांचा उदंड प्रतिसाद-

विश्वप्रभा हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या सशुल्क लसीकरणाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोविन ॲपवर नोंदणी करणाऱ्या नागरिकांना याठिकाणी लस मिळत आहे. त्यात 18 वर्षांपुढील सर्वांसाठी ही सुविधा आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध तालुकेच नाही तर नाशिक, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा येथील नागरिक देखील लस घेण्यासाठी जळगावात येत आहेत. याठिकाणी कमी वेळेत लस उपलब्ध होत असून, खासगी लसीकरण केंद्राचा पर्याय योग्य असल्याचे मत लस घ्यायला आलेल्या काही नागरिकांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने ऑनलाईन नोंदणीचा पर्याय शिथिल करण्याची गरज-

लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत बोलताना विश्वप्रभा हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश पाटील म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हे एकमेव प्रभावी शस्त्र आपल्या हातात आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी सरकारी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र, आता केंद्र सरकारने लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचा पर्याय शिथिल करून खासगी रुग्णालयांना परवानगी द्यायला हवी. यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करता येईल. ऑनलाईन नोंदणी करताना नागरिकांना असंख्य अडचणी येतात. अनेकांना नोंदणीच करता येत नाही. लसीकरणाचा स्लॉट काही मिनिटात आरक्षित होऊन जातो. त्यामुळे 45 वर्षांवरील नागरिकांना जसे थेट केंद्रांवर नोंदणी करून लस मिळते, त्याचप्रमाणे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना थेट खासगी हॉस्पिटलमध्ये लस मिळायला हवी. असे झाले तर लसीकरणाची टक्केवारी झपाट्याने वाढण्यास मदत होईल, असे डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांना वेगवेगळी स्वप्न पडण्याचा छंद, त्यावर मी काय बोलणार?'

Last Updated : May 28, 2021, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.