ETV Bharat / state

जनता कर्फ्यु दरम्यान दोन गटात हाणामारी; एकाची हत्या - रावेर

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. पण, या दरम्यान रावेर येथील मन्यार वाडा मशिदीजवळ दोन गटात हाणामारी झाली. यात एकाची हत्या झाली असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Mar 23, 2020, 3:54 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील रावेर येथील मन्यार वाडा मशिदीजवळ रविवारी रात्री दोन गटात हणामारी उसळली होती. यात 3 जण गंभीर जखमी झाले असून, 7 वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या हाणामारीत समाजकंटकांनी एका प्रौढाची डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालत निर्घृण हत्या केली आहे. सोमवारी (दि.23) सकाळी हा प्रकार उजेडात आला.

यशवंत मराठे (वय 58, रा. रावेर) असे हत्या झालेल्या प्रौढाचे नाव आहे. पोलिसांना सकाळी त्यांचा मृतदेह राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी रात्रीपासूनच रावेरात संचारबंदी लागू केली आहे. यात रसलपूर येथील जावेद सलीम (वय 25) व रावेरच्या बारी वाड्यातील दिगंबर अस्वार (वय 55), नीलेश भागवत जगताप (वय 26, रा. रावेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सर्वत्र अघोषित संचारबंदी होती. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक हाणामारी सुरू झाली. याचे कारण अज्ञाप स्पष्ट झाले नाही. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी रावेरात तळ ठोकून आहेत.

कट पूर्वनियोजित?

हा हाणामारीचा कट पूर्वनियोजित असल्याचे समोर येत आहे. समाजकंटकांनी यात दगड, विटांचा मारा तर केलाच शिवाय मद्याच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल टाकून त्याचे पेट्रोल बॉम्ब देखील तयार करण्यात आले होते. याच पेट्रोल बॉम्बमुळे वाहनांची अधिक प्रमाणात जाळपोळ झाली. घरांचेही नुकसान झाले असून सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या. तर खासदार रक्षा खडसेंनी देखील सकाळी पाहणी करत परिस्थितीचा आढावा जाणून घेतला.

हेही वाचा -जळगांव जिल्ह्यातही 'लॉक डाऊन'; सोमवारपासून बाजारपेठा बंदीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.