ETV Bharat / state

Bhusawal Fire News : भुसावळमध्ये अपार्टमेंटमधील घराला मध्यरात्री लागली आग; अग्नीतांडवात वडिलांचा मृत्यू - भुसावळ आग वडिलांचा मृत्यू लेटेस्ट बातमी

भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेज जवळील सोना एजन्सी, महेश नगरमधील अपार्टमेंटमधील घराला पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ( Fire in Mahesh Nagar Bhusawal ) या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. ( Bhusawal Mahesh Nagar Fire one Died )

Bhusawal Fire News
Bhusawal Fire News
author img

By

Published : Mar 26, 2022, 12:18 PM IST

Updated : Mar 26, 2022, 3:31 PM IST

भुसावळ (जळगाव) - शहरातील नाहाटा कॉलेज जवळील सोना एजन्सी, महेश नगरमधील अपार्टमेंटमधील घराला पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ( Fire in Mahesh Nagar Bhusawal ) या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. ( Bhusawal Mahesh Nagar Fire one Died ) नाहाटा कॉलेज जवळील सोना एजन्सी, महेश नगरमधील निकुंज अपार्टमेंटमध्ये चार जणांचा परिवार राहतो. आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याने या आगीत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ३२ वयोगटाचा तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रहिवाशांची प्रतिक्रिया

नागरिकांची घटनास्थळी धाव - या घटनेत घरातील सर्व सामान जळून खाक झाला आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिक व नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर तसेच कार्यकऱ्यांनी धाव घेतली तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमीस पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. आग लागल्याचे नेमके कारण समजू शकले नसून घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहोचले आहेत. पुढील तपास करीत आहे. महेश कॉलनीतील निकुंज अपार्टमध्ये मध्ये दुसर्‍या मजल्यावर केशवाला वाधवाणी हे आपल्या कुटुंबासह राहतात. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून आरोळ्या ऐकू आल्या. तसेच आगीच्या ज्वाला आणि धुर बाहेर निघू लागला. यामुळे इमारतीमधील रहिवाशांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा - रिक्षाचा प्रवास बेतला विद्यार्थीनीच्या जीवावर; 'एसटी बस सुरू असती तर वाचली असती तृप्ती' - नातेवाईकांचा आक्रोश

याप्रसंगी त्यांना वाधवाणी यांच्या घराला आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने अग्नीशामन दल आणि बाजारपेठ पोलिसांना पाचारण केले. फायरब्रिगेडच्या पथकाने केलेल्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. दरम्यान, या आगीत केशवलाल वाधवाणी (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा लखन वाधवाणी हा गंभीररित्या होरपळला गेला आहे. त्याला उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेऊन मदतकार्य केले.

यांनी केले तत्काळ मदत कार्य -

नगरसेवक महेंद्रसिंह उर्फ पिंटू ठाकूर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. वाधवान कुटुंबात चार जण राहत असून ही आग नेमकी कशी लागली याबाबत माहिती समोर आलेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. आगीमध्ये आपल्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मोठाभाऊ गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

Last Updated : Mar 26, 2022, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.