ETV Bharat / state

देवदर्शन करून घरी परतणारे पिता-पूत्र अपघातात ठार; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक - जळगाव अपघात बातमी

देवदर्शन करून घरी परतणारे पिता-पूत्र अपघातात ठार झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर शहराजवळ घडली. देवदर्शन करून ते घरी परत येत असताना फैजपूर ते भुसावळ रस्त्यावर पिंपरूड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली.

Father and son killed in road accident in Jalgaon
देवदर्शन करून घरी परतणारे पिता-पूत्र अपघातात ठार; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
author img

By

Published : Mar 13, 2021, 6:36 PM IST

जळगाव - अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने देवदर्शन करून घरी परतणारे पिता-पूत्र ठार झाले. हा अपघात आज सकाळी 11 च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर शहराजवळ घडला. फैजपूर ते भुसावळ रस्त्यावरील पिंपरूड फाट्याजवळ हा अपघात घडला असून, त्यात गोपाळ गेंदराज पाटील (वय 66) व त्यांचा मुलगा खेमचंद गोपाळ पाटील (वय 35) यांचा मृत्यू झाला. दोघेही फैजपूर शहरातील रहिवासी होते.

देवदर्शनावरून घरी परततांना झाला अपघात-

गोपाळ पाटील व खेमचंद पाटील हे दोघे जण आपल्या (एमएच 19 बीडी 5442) क्रमांकाच्या दुचाकीने फैजपूर येथून यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक येथे देवदर्शनासाठी गेलेले होते. देवदर्शन करून ते घरी परत येत असताना फैजपूर ते भुसावळ रस्त्यावर पिंपरूड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात गोपाळ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. खेमचंद पाटील हा गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर नागरिकांनी जखमी खेमचंद याला फैजपूर शहरातील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव येथे हलवण्यात आले. जळगावला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला.

अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल -

या अपघातप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पिता-पूत्रावर एकाच वेळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे फैजपूर शहरावर एकच शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.