ETV Bharat / state

जळगाव : मृग नक्षत्र गेले कोरडे, खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. परंतु, यावर्षी जून संपायला आला तरी पाऊस झालेला नाही. काही तालुक्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता. पण आजमितीस संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून, खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी हवा तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

farmer hopes for rain in kharip session jalgaon
खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा
author img

By

Published : Jun 26, 2021, 8:09 AM IST

Updated : Jun 26, 2021, 1:41 PM IST

जळगाव - जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिना संपायला अवघे ५ दिवस शिल्लक असतानाही पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे. यावर्षी संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात फक्त १५ ते १७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही पूर्वहंगामी कापसाची लागवड अधिक आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यात तर दुबार पेरणी करावी लागणार आहे, अशी स्थिती आहे.

स्थानिक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. परंतु, यावर्षी जून संपायला आला तरी पाऊस झालेला नाही. काही तालुक्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होता. पण आजमितीस संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून, खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी हवा तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

गेल्या वर्षी जूनमध्ये झाल्या होत्या ४० टक्के पेरण्या -

गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळ आले होते. त्यामुळे किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल झाला होता. मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सुमारे ३५ ते ४० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु, यावर्षी मान्सून लांबणीवर पडला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या १५ ते १७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस लांबला तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची भीती आहे. जिल्ह्यात पूर्वहंगामी कापसाची लागवड वगळली तर फक्त ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी झालेली नाही, अशी माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.

हेही वाचा - जळगाव : कोरोनाच्या 'डेल्टा प्लस व्हेरियंट'चे संकट; जिल्ह्यात पुन्हा निर्बंध

सव्वालाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड -

जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगामाचे एकूण लागवड क्षेत्र हे साडेसात लाख हेक्टर असून, त्यापैकी सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. त्या खालोखाल मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन तसेच उडीद व मूगाची लागवड होते. आतापर्यंत जिल्ह्यातील सव्वालाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली आहे. पावसाअभावी हंगामी कापसाच्या लागवडीवर परिणाम झाला असून, आता पाऊस झाल्यानंतरच जुलैत ही लागवड होणार आहे.

पेरणीची तालुकानिहाय आकडेवारी अशी -

जळगाव : ५ हजार २४२ हेक्टर
भुसावळ : ८ हजार ९२५ हेक्टर
बोदवड : १ हजार ३४९ हेक्टर
यावल : ४ हजार २०६ हेक्टर
रावेर : १३ हजार ४३५ हेक्टर
मुक्ताईनगर : ९ हजार ३१६ हेक्टर
अमळनेर : ५ हजार ३८६ हेक्टर
चोपडा : १० हजार ४२४ हेक्टर
एरंडोल : ५ हजार ७५० हेक्टर
धरणगाव : ५ हजार १२० हेक्टर
पारोळा : ६ हजार २०० हेक्टर
चाळीसगाव : २२ हजार ०३७ हेक्टर
जामनेर : १६ हजार ८४० हेक्टर
पाचोरा : १९ हजार २२१ हेक्टर
भडगाव : ६ हजार ०३१ हेक्टर

हेही वाचा - जामनेर पंचायत समितीतील गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक; कारवाईच्या मागणीसाठी उपोषण

Last Updated : Jun 26, 2021, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.