ETV Bharat / state

जळगावात बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; पाच जणांना अटक - जळगाव पोलीस बातमी

जळगाव पोलीसांनी बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. या प्रकरणी पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे.

जळगावात बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; पाच जणांना अटक
author img

By

Published : Jan 5, 2021, 7:32 PM IST

जळगाव - एमआयडीसीला लागून असलेल्या मन्यारखेडा शिवारात पार्टेशनच्या घरात सुरु असलेला बनावट दारु निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उद‌्वस्त केला. त्यात साडे तीन लाखाच्या दारुसह, स्पीरीट, मशिन व वाहने मिळून साडे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे.

दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल -

गणेश भाऊराव कोळी (२४, रा.शिरपूर), सुखदेव पूनमचंद पवार (३०,रा.चिखली, ता.शहादा), गणेश हिरालाल सोनवणे (२८,रा.अयोध्या नगर), सियाराम हरीराम पावरा (१९,रा.शिव कॉलनी) व भाईदास शिवला पावरा (१८,रा.धरबापाडा,मोराडी, ता.शिरपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवडाभरापासून सुरू होती दारु निर्मिती-

एमआयडीसीला लागूनच मन्यारखेडा शिवारात पत्री व पार्टेशनच्या घरात आठवडाभरापासून दारु निर्मिती केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सी.एच.पाटील यांना मिळाली होती. त्यानुसारअधीक्षक सीमा झावरे, बुलडाण्याचे निरीक्षक दीपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, आनंद पाटील, सागर पाटील, सहायक फौजदार डी.बी.पाटील, जवान अजय गावंडे, कुणाल सोनवणे, नितीन पाटील, मुकेश पाटील, अमोल पाटील, राहूल सोनवणे व नंदू नन्नवरे यांच्या पथकाने साध्या वेशात जावून कारखान्याला घेराव घातला. त्यामुळे एकालाही पलायन करण्यास संधी मिळाली नाही. दारु निर्मिती करतानाच पाचही जणांना ताब्यात घेतले. मशीन, दारु, स्पीरीट, बाटल्या व इतर साहित्यासह चारचाकी आणि दुचाकी ताब्यात घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.