ETV Bharat / state

लॉकडाऊनचा परिणाम, जळगावात रस्ते अपघातात प्रचंड घट - लॉकडाऊनचा परिणाम

संचारबंदीच्या काळात जळगाव जिल्ह्यात केवळ एकच मोठा अपघात झालेला आहे. तो अमळनेर तालुक्यातील झाडी गावाजवळ 3 दिवसांपूर्वी घडला होता. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना जेवण मिळत नाही. अशा लोकांना अन्नदान करून घरी परतणाऱ्या तरुणांची रिक्षा उलटल्याने 2 तरुण जागीच ठार झाले होते. हा अपघात वगळता मोठा अपघात झालेला नाही.

जळगावात रस्ते अपघातात प्रचंड घट
जळगावात रस्ते अपघातात प्रचंड घट
author img

By

Published : Apr 12, 2020, 10:06 AM IST

जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे सर्वच घटकांवर विपरित परिणाम होत असले, तरी काही बाबतीत त्याचे सकारात्मक परिणामदेखील पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातात प्रचंड घट झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या अपघातांचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे.

संचारबंदीच्या काळात जळगाव जिल्ह्यात केवळ एकच मोठा अपघात झालेला आहे. तो अमळनेर तालुक्यातील झाडी गावाजवळ 3 दिवसांपूर्वी घडला होता. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना जेवण मिळत नाही. अशा लोकांना अन्नदान करून घरी परतणाऱ्या तरुणांची रिक्षा उलटल्याने 2 तरुण जागीच ठार झाले होते. हा अपघात वगळता मोठा अपघात झालेला नाही.

एरवी जिल्ह्यातील रोजच्या अपघाताची आकडेवारी १५ ते २०च्या घरात आहे. विशेष म्हणजे, एक दिवसाआड रस्ते अपघातात कुणाचा तरी जीव जातो. मात्र, संचारबंदीत अपघाताच्या घटना थांबल्या आहेत. रस्त्यावर फिरायला निर्बंध असल्याने अनावश्यक वाहने रस्त्यावर दिसतच नाही. त्याशिवाय दारुची दुकाने बंद आहेत. मद्याच्या नशेत अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, त्या थांबल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.