ETV Bharat / state

राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसे 'अ‌ॅक्शन मोड'मध्ये; खान्देशातील व्यूहरचनेची करताहेत आखणी

नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांसोबत एकनाथ खडसेंची मुक्ताईनगर येथे भेट घेतली. या भेटीत खडसे आणि पाडवी यांच्यात बंदद्वार भेटीत नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय भूकंपाच्या विषयावर खलबते झाली.

भेटीवेळचे छायाचित्र
भेटीवेळचे छायाचित्र
author img

By

Published : Oct 26, 2020, 3:32 PM IST

Updated : Oct 26, 2020, 4:29 PM IST

जळगाव - भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजीमंत्री एकनाथ खडसे हे लागलीच 'अ‌ॅक्शन मोड'मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहेत. सोमवारी (दि. 26 ऑक्टोबर) दुपारी खडसे मुक्ताईनगर येथून जळगावात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांसोबत खडसेंची भेट घेतली. या भेटीत खडसे आणि पाडवी यांच्यात बंदद्वार भेटीत नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय भूकंपाच्या विषयावर खलबते झाली. नंदुरबार जिल्ह्यातील काही पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील या भेटीत व्यूव्हरचनेची आखणी झाल्याची माहिती मिळाली.

बोलताना माजी आमदार पाडवी

उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून परिचित असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. खडसे सोमवारी जळगावात दाखल झाल्यानंतर तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहादा शहरप्रमुख सुरेंद्र कुंवर, शहाद्याचे नगरसेवक इकबाल शेख, चंद्रकांत पाटील, बी. के. पाडवी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राजेंद्र वाघ, राजरत्न बिरारे, रोहित ढोडरे आदींच्या शिष्टमंडळाने खडसेंची भेट घेतली.

राजकीय चर्चेच्या अनुषंगाने ही भेट बंदद्वार झाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तसेच शहादा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीत प्राथमिक चर्चा झाली. त्याचप्रमाणे खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्यासोबत भाजप तसेच इतर पक्ष सोडून राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असलेल्या बड्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या नावांवर चर्चा झाली.

लवकरच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीमय होणार

बैठक आटोपून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना खुद्द माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी याबाबत दुजोरा दिला. खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. अनेक बडे राजकीय नेते व पदाधिकारी राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. पण, आताच त्यांची नावे जाहीर करता येणार नाहीत. आता चाचपणी सुरू आहे. वेळ आल्यावर सर्वांची नावे जाहीर केली जातील. लवकरच नंदुरबार जिल्हा हा राष्ट्रवादीमय होईल, असे सांगत माजी आमदार पाडवींनी उत्सुकता ताणून धरली. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व शहादा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देखील आमची खडसेंसोबत चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र, चर्चेचा तपशील आता सांगता येणार नाही, असेही पाडवी म्हणाले.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही खडसेंच्या भेटीला

जळगाव जिल्हा परिषदेचे भाजपचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हेदेखील सोमवारी दुपारी खडसे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी देखील खडसेंसोबत बंदद्वार चर्चा केली. मात्र, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे समजू शकले नाही. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत खडसे यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. आता खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष खडसे यांच्या संपर्कात असल्याने खळबळ उडाली आहे. खडसेंचे पहिले लक्ष्य जिल्हा परिषद असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.

हेही वाचा - 'भाजपमध्ये राहिलो असतो तर माझा आडवाणी, वाजपेयी केला असता'

Last Updated : Oct 26, 2020, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.